Rohit Sharma slang: त्या कारणामुळे मैदानातच रोहितने केली आयमाय वरून शिवीगाळ; कोणाला दिली ती घाणेरडी शिवी, पाहा व्हिडिओ..

0

Rohit Sharma slang: सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 2nd test live) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम (Vishakhapatnam) मैदानावर खेळवला जात असून, भारत मजबूत स्थितीत आहे. पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. साहजिकच त्यामुळे दुसरा कसोटी सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशातच मैदानावर रोहित शर्मा (Rohit Sharma) संताप पाहायला मिळाला असून, थेट शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

काल दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असताना इंग्लंडचे फलंदाज फलंदाजी करत होते. जॉनी बेअरस्टो आणि ओली पोप फलंदाजी करत होते. कुलदीप यादवचे (Kuldeep Yadav) षटक संपल्यानंतर, मैदानामध्ये खेळाडू आपापल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. रोहित शर्मा शांत आणि संयमी कर्णधार म्हणून ओळखला जातो. मात्र अनेकदा मैदानात खेळाडूंना शिवीगाळ करताना पाहायला देखील मिळाला आहे.

रोहित शर्माच्या अंदाजाविषयी बोलताना अनेक खेळाडूंनी देखील यावर भाष्य केलं आहे. रोहित शर्मा मैदानात एखाद्या खेळाडूने चूक केल्यानंतर, त्याला थेट शिवीगाळ करतो. मात्र सामना संपल्यानंतर तो लगेच खेळाडूंना हे केवळ सामन्यापुरतं मर्यादित होतं. मनाला लावून घ्यायचं अजिबात कारण नाही. असं देखील सांगतो. याविषयी खेळाडू उघडपणे सांगतात.

रोहित शर्माचा हाच अंदाज आता पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माचे घाणेरडे वाक्य स्टंप माइकमध्ये कैद देखील झाले आहे. रोहित शर्माने मैदानावर केलेली शिवीगाळ नक्की कोणाला आणि का दिली? हे मात्र स्पष्ट झालं नाही. अनेकांनी याचा थेट संबंध व्हॅलेंटाईन डेशी जोडला आहे.

मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत रोहित शर्मा म्हणत आहे, xxx कोई भी गार्डन में घूमेगा तो उसका xxxx उसका…! यावर क्लिक करून पहा व्हिडिओ काही मीडिया रिपोर्ट नुसार, खेळाडू बागेत फिरत असल्यासारखं निवांतपणे आपापल्या जागेवर जात असल्यामुळे रोहित शर्माने शिवीगाळ केली. काहींच्या मते व्हॅलेंटाईन डे दिवशी अनेक खेळाडू आपल्या पार्टनरला घेऊन फिरायला जाऊ नये, आणि त्याचा परिणाम या मालिकेवर होय नये, म्हणून असा प्रकार केल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा AB de Villiers On Virat Kohli: एबी डिव्हिलियर्सच्या त्या खुलाशाने खळबळ; विराट कोहलीने व्यक्त केला संताप, पाहा व्हिडिओ..

ENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.