AB de Villiers On Virat Kohli: एबी डिव्हिलियर्सच्या त्या खुलाशाने खळबळ; विराट कोहलीने व्यक्त केला संताप, पाहा व्हिडिओ..

0

AB de Villiers On Virat Kohli: बहुचर्चेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC world test championship) दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून विराट कोहली (Virat kohli) बाहेर झाला असल्याचं बोललं जात आहे. विराट कोहलीने अधिकृतरित्या पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारण देत विराट कोहली पहिल्या दोन कसोटीतून बाहेर झाला. एकीकडे विराट बाहेर होताच, दुसरीकडे चाहत्यांनी विराटने नक्की का माघार घेतली, याविषयी उलट सुलट चर्चा सुरू केल्या.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून विराट कोहलीने माघार घेतल्यानंतर, चाहत्यांमध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. आता मात्र या चर्चांवर पडदा पडला असून, विराटचा मित्र एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) याविषयी मोठा खुलासा केला आहे. काल इंस्टाग्राम लाईव्हच्या (instagram live) माध्यमातून एबी डिव्हिलियर्स विराट कोहली इंग्लड विरुद्धच्या मालिकेसाठी का उपलब्ध नाही, याविषयी खुलासा केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, विराट कोहली नाराज देखील झाला आहे.

सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याचा मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम मैदानावर खेळण्यात येत आहे. पहिल्या डावात भारतीय संघाकडे 143 धावांची आघाडी होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडे 273 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. माता दुसऱ्या सामन्यापेक्षा अधिक चर्चा विराट कोहली विषयी एबी डिव्हिलियर्सने केलेल्या खुलाशाची होत आहे.

काल एबी डिव्हिलियर्सने आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्राम वरून लाईव्ह चॅट केले. या चार्टमध्ये एका चाहत्याने विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी का उपलब्ध नाही? विराट कोहली अडचणीत आहे का? तुमचं त्याच्याशी बोलणं झालं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर एबी डिव्हिलियर्सने विराट कोहली सोबत केलेले सिक्रेट चॅट उघड केले. ज्यामुळे एकप्रकारे खळबळ उडाली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी विराट का उपलब्ध नाही, याविषयी विराटने आणि बीसीसीआयने (BCCI) देखील कारण स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी संभ्रमता होती. मात्र काल एबी डिव्हिलियर्सने याविषयी खुलासा केला. लाईव्ह चॅटमध्ये तो म्हणाला, विराटचं आणि माझं बोलणं झालं आहे. सगळं काही ठीक आहे. तो सध्या आपल्या फॅमिली सोबत आहे. त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याने, तो आपल्या परिवारासोबत असल्याचं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे विराट कोहलीने आपले हे सीक्रेट एबी डिव्हिलियर्सला सांगून टाकले. मात्र इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून नकळत एबी डिव्हिलियर्सच्या तोंडून सर्व काही बाहेर आले. ज्याच्यामुळे विराट कोहली देखील नाराज झाला असल्याचं बोललं जात आहे. विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार असल्याने चाहते आता चांगलेच खुश असून, विराटच्या अनुपस्थिती विषयी असणारी संभ्रमता देखील दूर झाली आहे.

हे देखील वाचा  ENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

Virat Kohli update: ..म्हणून विराट कोहली तिसऱ्या कसोटीतूनही बाहेर; गंभीर संकटाला तोंड देतोय विराट कोहली..

Acharya Chanakya on wife: बायकोपासून या चार गोष्टी लपवल्या तरच मिळेल सन्मान आणि नातं टिकेल दीर्घकाळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.