ENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

0

ENG vs IND 2nd test: पहिल्या कसोटी सामन्यात मान हानिकारक पराभवाचा सामना केल्यानंतर, भारतीय संघ दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन बडे झटके लागले आहेत. यापूर्वीच विराट कोहलीने (Virat kohli) पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. त्यातच आता केएल राहुल (kl Rahul) आणि जडेजा (ravindra jadeja) दोघेही दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.

केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे इन्फॉर्म फलंदाज बाहेर जाण्याने, भारतीय संघाचे संपूर्ण कॉम्बिनेशन बिघडलं आहे. दुसरीकडे इंग्लंडने मात्र पहिल्या डावाच्या पिछाडीनंतर ऐतिहासिक विजय साकारून मैदानात उतरणार आहे. साहजिकच त्यामुळे इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला आहे. 2 फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे पारडे जड असून, भारतीय संघ कमालीचा बॅक फुटवर आहे.

गेल्या काही वर्षात इंग्लंड संघाने कसोटीमध्येही आक्रमक खेळाचे प्रदर्शन केलं आहे. बेसबॉल म्हणून, (baseball) या खेळाला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली. भारतीय मैदानावर मात्र इंग्लंडचा हाच आक्रमकपणा कायम राहील का? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या सगळ्यांना तीरांजली देत इंग्लंडने आपल्याच शैलीत भारतीय संघाला पराभूत करत बेसबॉल कुठेही खेळला जाऊ शकतो, हे दाखवून दिलं.

एकीकडे इंग्लंड आता आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाला असंख्य अडचणी आणि बिघडलेल्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरावं लागणार आहे. दोन किंवा तीन तीन डेब्यू खेळाडूंसह भारतीय संघाला मैदानात उतरण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. रजत पाटीदार (rajat Patidar) सरफराज खान (sarfaraaz khan) सौरभ कुमार (Sourabh Kumar) हे तीन खेळाडू डेब्यू करताना दिसणार आहेत.

दुसऱ्या कसोटीत तीन खेळाडू डेब्यू करणार असल्याने, भारतीय संघाची फलंदाजी अर्थात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आली आहे. रोहित शर्माला देखील गेल्या काही सामन्यांमधून फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजी क्रमात एकही आश्वासक चेहरा सध्या तरी पाहायला मिळत नाही. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रचंड पिछाडीवर आहे.

इंग्लंडचे फलंदाज भारतीय मैदानावर टिकू शकतील का? स्पिन गोलंदाजाचा सामना इंग्लंड करू शकेल का? याकडे अनेकांचे लक्ष होतं. मात्र इंग्लंडने स्पिन गोलंदाजी खेळण्याचा पर्याय शोधला. केवळ शोधलाच नाही, तर दमदार फलंदाजी करून भारतीय संघाला नमवण्याचा करिष्मा देखील केला. भारतीय खेळपट्ट्यांवर स्पिन गोलंदाजाचा सामना इंग्लंडचे फलंदाज करू शकतील का, या प्रश्नाचा उत्तर इंग्लंडने पहिल्या सामन्यात दिले. याच कारणामुळे आता इंग्लंडचा संघ दुसरा कसोटी सामना सहज जिंकेल अशी शक्यताही निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा  IND vs ENG 2nd test: दुसऱ्या कसोटीतून जडेजा, राहुल बाहेर, शुभमन गिललाही डच्चू; हे तीन खेळाडू करणार डेब्यू..

Rohit Sharma on Virat kohli ..म्हणून विराट कोहली होणं सोप्पं नाही; मी खूप लकी आहे त्याला.; रोहितचं विराट विषयी मोठं विधान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.