Rohit Sharma on Virat kohli ..म्हणून विराट कोहली होणं सोप्पं नाही; मी खूप लकी आहे त्याला..,”; रोहितचं विराट विषयी मोठं विधान..

0

Rohit Sharma on Virat kohli भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि किंग म्हणून परिचित असणारा विराट कोहली (Virat Kohli) या नात्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. आपल्या फलंदाजी आणि फिटनेसची जगाला भुरळ पाडली आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma):या दोघांचे संबंध चांगले नसल्याचं अनेकदा बोललं जातं. दोघांचेही चाहते एकमेकांवर टीका करतानाही पाहायला मिळतात. मात्र वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी पाहायला मिळते.

काही वर्षांपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचे संबंध चांगले नव्हते, हे नाकारता येणार नाही. मात्र आता दोघांचा बॉण्डिंग कमालीचा झाला असून, दोघेही एकमेकांचे तोंड भरून कौतुक करताना एकदा पाहायला मिळतात. इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्या दरम्यान रोहित शर्माची दिनेश कार्तिकने (dinesh Karthik) मुलाखत घेतली. या मुलाखतीत रोहित शर्मा विराट कोहलीच कौतुक करताना त्याने अचिव केलेल्या अनेक गोष्टींविषयी भाष्य केलं.

आपल्या खेळाविषयी विराट कोहलीची असणारी भूक, समर्पण, प्रेम एकनिष्ठा शब्दात सांगता येणे अशक्य आहे. देशासाठी खेळण्यासाठी विराट नेहमीच तत्पर असतो. भारतीय खेळाडू दुखापतीमुळे माघार घेताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र दुखापतीमुळे विराट कोहलीने अद्याप पर्यंत एकही सामना गमावला नाही. रोहित शर्माने याच गोष्टींकडे लक्ष वेधले.

दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, विराट कोहली होणं सोपं नाही. विराट कोहली किती उत्कृष्ट फलंदाज आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र विराट कोहली आपल्या खेळाविषयी किती प्रामाणिक आहे, किती हंग्री आहे, हे खूप शिकण्यासारखे आहे. मी खूप लकी आहे, विराट कोहलीला जवळून पाहू शकलो. विराट आतापर्यंत एकदाही दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झालेला नाही.

दुखापती किंवा इतर कारणांची रिकवरी करण्यासाठी विराट कोहली एकदाही नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये (NCA) दाखल झाला नाही. ही गोष्ट सोपी नाही. पर्सनल कारणामुळे त्याने सामने खेळले नसतील, मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही, असे एकदाही झालं नाही. एकदाही तो एनसीएममध्ये रिकव्हरीसाठी गेलेला नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे विधान रोहित शर्माने विराट कोहलीवर केलं आहे.

रोहित शर्माने विराट कोहलीवर केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माचे संबंध ठीक नाहीत, असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला ही एक चपराक आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत देखील रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतुक केले होते.

हे देखील वाचा  IND vs ENG 2nd test: दुसऱ्या कसोटीतून जडेजा, राहुल बाहेर, शुभमन गिललाही डच्चू; हे तीन खेळाडू करणार डेब्यू..

Indian Army Recruitment 2024: भारतीय सेनामध्ये 381 जागांसाठी मेगा भरती; कोणाला करता येणार अर्ज? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.