Acharya Chanakya on wife: बायकोपासून या चार गोष्टी लपवल्या तरच मिळेल सन्मान आणि नातं टिकेल दीर्घकाळ..

0

Acharya Chanakya on wife: रक्तपलीकडच्या नात्यापेक्षाही पती-पत्नीचे नातं (husband wife relationship) अधिक घट्ट असतं, असंही बोललं जातं. पती-पत्नीचे (husband wife) नाते दीर्घकाळ टिकवायचं असेल तर दोघांच्याही नात्यांमध्ये पारदर्शकता फार महत्त्वाची असते असंही सांगितले जाते. मात्र आचार्य चाणक्य (acharya Chanakya) यांचं याविषयी वेगळं मत आहे. पत्नीकडून जर तुम्हाला सन्मान हवा असेल, नातं कायम टिकवायचं असेल, तर काही गोष्टी पतींपसून लपवायला हव्यात अस चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांची ओळख नव्याने करून देण्याच्या आवश्यकता नाही. आचार्य चाणक्य थोर विद्वान होते. जवळपास सर्वच विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. नातेसंबंध याविषयी देखील त्यांनी आपल्या चाणक्य निती (Chanakya niti) या ग्रंथांमध्ये सविस्तर मांडणी केली आहे. ज्यामध्ये पती-पत्नी या नात्याचा विशेष करून त्यांनी उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांनी पत्नीला काही गोष्टी चुकूनही सांगू नये, असं नमूद केलं आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

चाणक्य सांगतात, पती आपली अर्धांगिनी असली तरी काही गोष्टी पासून तिला कायम दूर ठेवायला हवं. आपल्या पत्नीला आपल्याविषयी प्रत्येक गोष्ट माहिती असायलाच हवी, असं अजीबात नाही. काही गोष्ट लपवणे अधिक महत्वपूर्ण असल्याचं ते सांगतात. आपल्या पत्नीला आपली काय कमजोरी आहे, याविषयी कधीही सांगू नका, असं चाणक्य सांगतात. जर तुमच्या पत्नीला तुमची कमजोरी माहिती झाली, तर ती त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ शकते, असं चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, जर तुमची कुठे फसवणूक झाली असेल, तुमचा कोणाकडून अपमान झाला असेल, तर याविषयी पत्नीला कधीही सांगू नका. तुमच्या फसवणुकीविषयी पत्नीला तुम्ही जर सांगितलं, तर पत्नीला तुम्ही कमकुवत असल्याचं लक्षात येते. किंवा तिचा तसा समज होतो. नाहीतर भविष्यात वाद झाल्यानंतर,पत्नी तुमच्या अपमानाची आणि फसवणुकीची आठवण देखील करून देते. त्यामुळे अशा गोष्टी पत्नीला चुकूनही सांगू नका, असं चाणक्य सांगतात.

एखाद्या मित्राला किंवा गरजवंताला केलेली मदत तुम्ही कोणालाही सांगू नका. अगदी पत्नीला देखील याविषयी माहिती असू नये, असं सांगतात. जर तुम्ही केलेली मदत पत्नीला माहिती झाली, तर पत्नी वादासाठी याचे भांडवल करू शकते. आचार्य चाणक्य सांगतात, तुमचा इन्कम किती आहे, याविषयी देखील पत्नीला माहिती होऊ देऊ नका. तुमच्या इन्कम विषयी पत्नीला माहिती झाले, तर ती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या खर्चाविषयी देखील अपडेट ठेवेल. यामुळे इन्कमची माहिती पत्नीला देऊ नका, असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा  Hardik Pandya Rohit Sharma: पांद्याचा पुन्हा छपरीपणा; रोहित शर्माला टार्गेट करत केले..

ENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.