Hardik Pandya Rohit Sharma: पांद्याचा पुन्हा छपरीपणा; रोहित शर्माला टार्गेट करत केले..

0

Hardik Pandya Rohit Sharma: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रोहित शर्मा (rohit sharma) या दोघांमध्ये सगळं काही अलबेला नाही, हे आता उघड झालं आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याची कर्णधार पदी घोषणा केल्यानंतर, रोहित शर्माची पत्नी रितिकाने (Ritika) उघड आपली नाराजी बोलून दाखवली. हार्दिक पांड्याची कर्णधार पदी निवड केल्यानंतर, रोहित शर्मा कडून त्याला कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या नाहीत. आपल्याला कर्णधार केल्यामुळे, रोहित शर्मा खुश नसल्याचे लक्षात आल्यानंतर हार्दिक पांड्या देखील रोहित शर्माला डिवचताना पाहायला मिळाला.

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघापासून दूर आहे. एकदिवसीय विश्वचषकात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्या थेट आयपीएलमध्ये (ipl) पुनरागमन करणार असल्याचे बोललं जात आहे. आयपीएलसाठी हार्दिक पांड्याची जोरदार तयारी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

हार्दिक पांड्या आपल्या फिटनेस संदर्भातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिटनेस ट्रेनिंगचे व्हिडिओ पोस्ट करताना हार्दिक पांड्या भन्नाट कॅप्शन देत आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चाही सुरू आहे. हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याचे संबंध थेट रोहित शर्माशी लावले जात आहेत.

पांड्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ट्रेनिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने कोण-कोणत्या व्यायाम प्रकारचे किती सेट मारायचे यासंदर्भात एक चार्ट तयार केला आहे. हा चार्ट हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्याने ट्रेनिंग संदर्भातला व्हिडिओच नाही, तर इंस्टाग्राम डीपी देखील बदलला आहे. ज्यामुळे तो देखील रोहित शर्माला टार्गेट करत असल्याचं बोललं जात आहे.

भारतीय क्रिकेट निवड समितीने पुन्हा रोहित शर्माची t20 संघात निवड केली आहे. केवळ निवडत नाही, तर टी ट्वेंटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकात रोहित हाच भारतीय संघाचा कर्णधार असेल हे जवळपास स्पष्ट झाला आहे. साहजिकच या निर्णयामुळे हार्दिक पांड्या दुखावला आहे.

निवड समितीने घेतलेला हा निर्णय हार्दिक पांड्याच्या पचनी पडला नसून, या निर्णयावर आपली नाराजी बोलून दाखवण्यासाठी हार्दिक पांड्याने t20 संघाच्या जर्सीमधील असणारा आपला फोटो इंस्टाग्रामवर डीपी म्हणून ठेवला आहे. हार्दिक पांड्याने डीपी बदलल्याने अजूनही हार्दिक पांड्याला t20 संघाचे कर्णधारपद मिळण्याची आशा कायम आहे, असं बोललं जात आहे. एक प्रकारे हार्दिक पांड्या रोहित शर्माला टार्गेट करत असून, हा निव्वळ छपरीपणा असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

हे देखील वाचा ENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.