YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..

0

YouTube Income Tips: अलीकडच्या काळात क्रिएटरची (YouTube creators) संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अनेक जण व्हिडिओ बनवण्यात प्रचंड व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. मात्र अनेकांना व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कसे मिळतात, हेही माहीत नसतं. अनेक जण केवळ मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवतात. आणि युट्युबवर अपलोड करतात. मात्र युट्युब तुम्हाला दरमहा लाख रुपये मिळवून देखील देत आहे.

जर तुमच्याकडे अनेक कल्पना असतील, व्हिडिओ बनवण्याची आवडत असेल, तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून दरमहा लाख रुपये कमवू शकता. आज आपण youtube च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे? त्याचबरोबर युट्युब चॅनेल मॉनिटाइज (YouTube monetization) होण्यासाठी निकष काय? आणि कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते? याविषयी देखील सविस्तर जाणून घेणार आहोत.

अलीकडे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरच्या व्हिडिओची अनेकांना भुरळ पडली आहे. साहजिकच व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व्हिडिओ बनवून व्ह्यूज मिळवणे आणि त्या माध्यमातून पैसे कमावणे हे अधिक सोयीस्कर झालं आहे. सर्व प्रथम आपण यूट्यूब चैनल मॉनिटाइज करण्यासाठीचे काय निकष आहेत? हे पाहू..

जर तुम्हाला युट्युब वरती व्हिडिओ अपलोड करून त्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील, तर काही निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. Youtube ने आपल्या पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. मात्र ही पॉलिसी अद्याप लागू करण्यात आली नाही. रिपोर्टनुसार युट्युब मॉनिटाईज करण्यासाठी तुमच्याकडे पाचशे सबस्क्राईब असणे आवश्यक आहेत. मात्र ही पॉलिसी अद्याप लागू करण्यात आली नाही. त्यामुळे youtube चैनल monetization करायचा असेल तर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर असणे आवश्यक आहे.

एक हजार सबस्क्रायबर बरोबर तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओनी एका वर्षामध्ये 4,000 तास पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. यूट्यूबच्या या दोन अटी तुम्ही पूर्ण केल्या, तर तुम्हाला व्ह्यूजनुसार पैसे मिळतात. जर तुमचे व्ह्यूज चांगल्या प्रकारे जात असतील, कंटेंटही चांगला असेल तर तुम्हाला १००० व्ह्यूला 40 ते 50 रुपयांच्या आसपास पैसे मिळतात. या बरोबर तुम्हाला अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील मिळतात. सुपर चॅटच्या माध्यमातून देखील कमेंटद्वारे पैसे मिळतात.

कंटेंट कसा असावा

कन्टेन्ट बनवताना तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. नेहमी विषय निवडताना तुम्ही ट्रेडिंग विषयावर व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे. तुमचा व्हिडिओ कोणत्याही कम्युनिटी विरोधात नसणे आवश्यक आहे. याची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही एक विषयी घेऊन त्याच संदर्भात व्हिडिओ बनवले तर तुम्हाला अधिक फायदा होतो. आता तुम्ही स्पोर्ट हा विषय निवडला, तर तुम्ही केवळ स्पोर्टचे व्हिडिओ टाकने फायदेशीरठरते.

हे देखील वाचा AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

IND vs AFG T20I Squad : केएल राहुलचे T20 करिअर संपुष्टात; विराट रोहितचा दरारा कायम..

GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..

Chanakya on money: चाणक्यांची ही गोष्ट पाळा खिसा कायम राहील गरम; अन्यथा आयुष्यभर कराल वणवण..

cumin side effects: तुम्हीही सतत भाजीत जिरे टाकता? थांबा, जाणून घ्या जिऱ्याच्या सेवनाचा आरोग्यावर होणारा परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.