AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

0

AFG vs IND T20 squad: भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20 series) यांच्यामध्ये 11 जानेवारी पासून तीन सामन्यांची T20 सिरीज खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर 11 जानेवारीला पार पडेल. तीन सामन्याच्या या टी ट्वेंटी सिरीजसाठी भारतीय संघाची आज अधिकृत घोषणा करण्यात येणार असली तरी संपूर्ण संघ समोर आला आहे. या मालिकेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघाची चर्चा ही आता जोरदार सुरू आहे. याचे कारण म्हणजे, पुन्हा एकदा विराट कोहली (Virat kohli) आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) T-20 संघात संधी देण्यात आली आहे. (Rohit Sharma Virat Kohli in T20 I against Afghanistan)

विराट कोहली आणि रोहित शर्माचे t20 (Virat Kohli Rohit Sharma T20 squad) संघात निवड केली गेली असली तरी अनेक खेळाडूंना मात्र डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे केल राहुल. (Kl Rahul) अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या t20 मालिकेसाठी राहुलची निवड केली नसल्याने आता आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकात देखील क्रिकेट चाहत्यांना राहूल खेळताना दिसणार नाही.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा शिवाय t20 संघ बांधायला सुरुवात केली गेली. हार्दिक पांड्या T20 संघाचा कर्णधार असेल, हे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. मात्र 2022 नंतर खेळल्या गेलेल्या अनेक t20 मालिकांमध्ये हार्दिक पांड्याने (hardik Pandya)कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली. 2022 नंतर आता अचानक विराट कोहली आणि रोहित शर्माची t20 संघात निवड केली आहे, सहाजिकच त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा हाच भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

एकीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या ट्वेंटी करिअरला संजीवनी मिळाली असली, तरी दुसरीकडे मात्र केअर राहुल, श्रेयस अय्यर, रविद्र जडेजा (Shreyas Iyer) या तिघांचे t-20 करिअर मात्र संपुष्टात आले आहे. या तिघाबरोबरच ईशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिल (shubman gill) या दोघांना देखील टी-ट्वेंटी संघाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळताना दिसणार आहे. चौथ्या क्रमांकावर शुभमनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर तो कशी कामगिरी करतो, यावरही त्याचे करिअर अवलंबून असणार आहे. यशस्वी जयस्वाल सलामीला दमदार सुरुवात करून देत असल्यामुळे, शुभमन गिलला सलालीला खेळण्याची संधी मिळणार नाही.

पाचव्या क्रमांकावर क्रिकेट चाहत्यांना रिंकू सिंह खेळताना पाहायला मिळेल. सहाव्या क्रमांकावर ईशान किशन किंवा जितेश शर्मा या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल. पाचव्या क्रमांकावर जितेश शर्माने दमदार फटकेबाजी केली आहे. ईशान किशन टॉप ऑर्डरचा फलंदाज असल्याने, तो या क्रमांकावर येऊन सामना फिनिश करू शकतो की नाही, यावरही प्लेइंग इलेव्हनचं गणित अवलंबून असेल.

असा असेल पहिल्या टी ट्वेंटीसाठी भारतीय संघ; 

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, शुभमन गिल, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, दीपक चहर

हे देखील वाचा IND vs AFG T20I Squad : केएल राहुलचे T20 करिअर संपुष्टात; विराट रोहितचा दरारा कायम..

GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..

Aishwarya Rai Abhishek Bachchan divorce : ऐश्वर्या रायने सोडलं घर! अभिषेक सोबतच्या घटस्फोटावरही करणार खुलासा..

Test Cricket Future: आयपीएलमुळे टेस्ट क्रिकेटचा झाला सत्यानाश; भारतीय टेस्ट संघाचं भविष्यही धडकी भरवणारं..

mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.