Test Cricket Future: आयपीएलमुळे टेस्ट क्रिकेटचा झाला सत्यानाश; भारतीय टेस्ट संघाचं भविष्यही धडकी भरवणारं..

0

Test Cricket Future: आयपीएलची (IPL ) क्रेझ केवळ भारतातच नाही, तर जगभरात पोहोचली आहे. आयपीएल फ्रेंचाइजीचे विदेशी टी-ट्वेंटी क्रिकेट लिगमध्येही आपले संघ आहेत. दक्षिण आफ्रिकेने नुकताच आपला न्युझीलंड दौऱ्यासाठीचा टेस्ट संघ जाहीर केला. संघ जाहीर होताच, आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी दुय्यम संघ निवडला आहे. दुय्यम संघ निवडण्याचे कारण म्हणजे, देशांतर्गत सुरू होणाऱ्या t20 लीग.

दक्षिण आफ्रिकेने दुय्यम संघ निवडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टी वॉने यावर टीका केली आहे. जर मी न्युझीलंड संघात असतो, तर मी ही टेस्ट मालिका खेळण्यासाठी तयारीही झालो नसतो, असेही तो म्हणाला आहे. आयपीएलमुळे इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटवर परिणाम झाला आहे. हे उघड आहे, मात्र त्यापेक्षा जास्त फटका हा भारतीय टेस्ट संघाला बसला आहे. इतकंच नाही तर भारतीय टेस्ट संघाचे भविष्य प्रचंड अंधारातही आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका नुकतीच पार पडली. दोन्ही कसोटी सामने चार दिवसही चालले नाहीत. दुसरा कसोटी सामना तर केवळ दीड दिवसांमध्ये संपुष्टात आला. आतापर्यंत सर्वाधिक कमी षटकात कसोटी सामना संपण्याची ही पहिलीच वेळ होती. अनेक जण खेळपट्टीला दोष देत आहेत, मात्र याच खेळपट्टीवर विराट कोहली आणि एडन मार्कराम या खेळाडूंनी टेक्निक असेल तर मैदानात टिकता येऊ शकते. हे दाखवून दिले. त्यामुळे खेळपट्टी खराब होती, हे सत्य नाही, हेच स्वीकारावे लागेल.

भारताच्या कसोटी संघाविषयी बोलायचं झाल्यास, भारतीय कसोटी संघ भविष्यात कुठेही नसेल, हे आत्ता स्पष्ट जाणवत आहे. विराट कोहली (Virat Kohli) नंतर भारतीय कसोटी संघात कोणता फलंदाज मैदानात टिकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सामना करू शकतो, हे कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रहाणे, ऋषभ पंत या चौघानंतर विदेशात खेळणारा एकही खेळाडू भारताच्या टेस्ट संघात सध्यातरी पाहायला मिळत नाही.

भारतीय संघ आता चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांशिवाय पुढे गेला आहे. या दोघांची जागा भरून काढणारे फलंदाज अद्यापही भारतीय संघात नाहीत. नवीन खेळाडूंना काही सामने द्यायला हवेत, हे खरं असलं तरी श्रेयश, यशस्वी जयस्वाल शुभमन गिल या तिघांच्या फलंदाजीमध्ये अनेक त्रुटी आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर कोणताही फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सामना करू शकतो. मात्र विदेशात खेळण्यासाठी टेक्निकली प्रचंड साऊंड फलंदाजाची आवश्यकता असते. मात्र या तिघांच्या फलंदाजीमध्ये टेक्निकली अनेक त्रुटी आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा या दोघांनंतर भारताच्या टेस्ट संघाचे भविष्य फारच आव्हानात्मक असणार आहे. भारतीय टेस्ट संघात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, लक्ष्मण विराट कोहली यासारख्या टेक्निकली करेक्ट आणि मेंटली स्ट्रॉंग फलंदाजांची आवश्यकता आहे. मात्र सध्या भारतीय संघात असे फलंदाज कुठेही पाहायला मिळत नाहीत. हनुमा विहारीच्या रूपात भारताच्या संघात तंत्रशुद्ध फलंदाज होता. मात्र त्याला वगळण्याचे कारण कोणालाही समजू शकले नाही.

आयपीएलमुळे अनेक नवीन खेळाडू केवळ आक्रमक फटकेबाजीच्या खेळावर लक्ष देताना पाहायला मिळतात. मात्र स्विंग गोलंदाजी, बाऊंसर गोलंदाजी खेळताना हे फलंदाज एक्सपोज होताना दिसतात. यामध्ये श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल या दोघांचं नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. एकंदरीत भारतीय स्टेट संघाचे भविष्य फार चिंताजनक असून लवकरात लवकर बीसीसीआयला टेस्ट क्रिकेटमध्ये मैदानावर टिकून राहणाऱ्या फलंदाजांचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा भारत टेस्ट क्रिकेटमध्ये कुठेही दिसणार नाही.

हे देखील वाचा  Flipkart Big Bachat Dhamaal Sale : होय smartphone, laptop, earbuds खरेदीवर 80 टक्के सूट..

IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..

Men women relationship: पुरुष आणि महिला दोघांचे वीक पॉईंट माहिती असायलाच हवे; जाणून घ्या दोघांचेही वीक पॉईंट..

Google pay New rules: 45 दिवसांसाठी Google pay आणि phone pay देणार आता उसने पैसे; जाणून घ्या रक्कम आणि प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.