IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..

0

IND vs AFG T20 series: 2022 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषका नंतर भारताच्या टी-ट्वेंटी संघात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांनाही संधी दिली गेली नाही. या दोघांशिवाय हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-ट्वेंटी संघ बांधायला सुरुवात केली गेली. इतकचं नाही, तर 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकातही हार्दिक पांड्या हाच कर्णधार असेल, हे जवळपास स्पष्ट झालं होतं. मात्र आता हार्दिक पांड्याला चांगलाच झटका बसला आहे.

आयपीएलमध्ये (ipl):हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने विजेतेपद आणि फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हार्दिक पांड्याला भारताच्या t20 संघाचा आगामी कर्णधार म्हणून पाहिलं गेलं. 2022 आणि त्यानंतर झालेल्या अनेक T20 सिरीज मध्ये हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून देखील निवड केली गेली. हार्दिक पांड्याच्या संघात रोहित आणि विराट कोहलीला वगळण्यात आले.

आता मात्र हार्दिक पांड्या हा भारताच्या t20 संघाचा कर्णधार नसणार आहे. हे स्पष्ट झालं आहे. हार्दिक पांड्याची दुखापत त्याची पाठ सोडत नसल्याने, अतिरिक्त रिस्क नको म्हणून, भारताच्या t20 संघाचा कर्णधार आता रोहित शर्माचं असणार आहे. आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजसाठी देखील हार्दिक उपस्थित नसणार आहे. त्यामुळे थेट टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड करणे योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

11 जानेवारीपासून अफगाणिस्तान विरुद्ध भारत 3 t20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. तीन टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहलीच्या मैदानावर पार पडणार आहे. तीन t20 सामन्याच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केली जाणार आहे. हे दोघेही t20 क्रिकेटमध्ये पुन्हा परतले असल्याने, आता हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदाचा पत्ता कट झाला आहे. इंडियन एक्सप्रेसचे स्पोर्ट जर्नालिस्ट देवेंद्र पांडे (Devendra Pandey) यांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इंडियन एक्सप्रेसचे स्पोर्ट जर्नालिस्ट देवेंद्र पांडे यांच्या रिपोर्ट नुसार, अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन टी-ट्वेन्टी सामन्यांचा मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केली जाणार आहे. आगामी t20 च्या दृष्टीने या दोघांना संधी दिली असल्याने, आता हार्दिक पांड्या अधिकृतरित्या t20 संघाचा कर्णधार नसणार आहे, हेही यामुळे स्पष्ट झालं आहे. याशिवाय अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा Jitendra Awhad news: खरंच राम मांस खात होता? जाणून घ्या सत्यता..

Men women relationship: पुरुष आणि महिला दोघांचे वीक पॉईंट माहिती असायलाच हवे; जाणून घ्या दोघांचेही वीक पॉईंट..

Google pay New rules: 45 दिवसांसाठी Google pay आणि phone pay देणार आता उसने पैसे; जाणून घ्या रक्कम आणि प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.