Jitendra Awhad news: खरंच राम मांस खात होता? जाणून घ्या सत्यता..

0

Jitendra Awhad news: मर्यादा पुरुषोत्तम अशी रामाची ओळख आहे. राम हा एक श्रेष्ठ राजा होता. प्रतिष्ठा, करुणा, दया, सत्य, नैतिकता आणि धर्म या मार्गांनी रामाने राज्य केलं. आणि म्हणून रामाला (shri ram) मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटले जाते. परंतु अलीकडे रामावरून मोठा प्रमाणात राजकारण होताना पाहायला मिळतं. खासकरून राजकारण्यांमध्ये रामाचे हे गुण कुठेही पाहायला मिळत नाहीत, तरीही या लोकांना राम प्रिय आहे, हे खरं म्हणजे मोठं आश्चर्य आहे. (Jitendra Awhad  on Prabhu Shri Ram)

22 जानेवारीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना होणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन सरकारी इव्हेंट म्हणून केला जात असल्याचा विरोधक आरोप करत आहेत. राम मंदिर हे कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसून, त्यावर सगळ्यांचा हक्क आहे. परंतु सरकार राजकारण करत असल्याचा विरोधक आरोप करत आहेत.

एकीकडे राम राम मंदिराच्या उद्घाटनावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक विधान केलं आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम हे बहुजनाचे होते. ते शाकाहारी नव्हते, ते शिकार करत होते. असं विधान केलं. आता या विधानाला चांगलाच राजकीय रंग आला असून, अनेकांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे अनेकांना राम हे खरंच मांस खात होते का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे राजकीय वाद, आणि एकमेकांवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. राजकीय वादात न पडता जाणून घेऊया, खरंच राम मांस खात होते का?

ज्येष्ठ लेखक अमिष त्रिपाठी (Amish Tripathi) यांनी रामा विषयी एक पुस्तक लिहिलं आहे. ज्याचं नाव “सायन ऑफ़ इक्ष्वाकु’ असं आहे. या पुस्तकात त्यांनी राम मांस खात होते, असा उल्लेख केला आहे. BBC दिलेल्या मुलाखती ते म्हणतात, राम हे क्षत्रिय होते त्यामुळे माझ्या कहाणीमध्ये ते मांस खात होते. वाल्मिकी यांच्या रामायणमध्ये देखील याचा उल्लेख केला असल्याचं ते सांगतात. पुढे म्हणतात, परंतु रामचरितमानसमध्ये त्यांना देवाच्या रूपात दाखवण्यात आलं.

अमिष त्रिपाठी म्हणतात, पुस्तक लिहिण्यासाठी मी दोन वर्ष रिसर्च केला आहे. ऐतिहासिक गोष्टींमध्ये एका पेक्षा जास्त दृष्टिकोन असू शकतात. वाल्मिकी यांच्या रामायणामध्ये राम मांस खात होते, असं अमिष त्रिपाठी सांगतात. रामाविषयी भारतीय लोकांच्या आस्था जोडलेल्या आहेत. प्रत्येकाचा रामाकडे पाहण्याचा, रामाकडून आदर्श घेण्याचा दृष्टिकोनही वेगवेगळा असू असतो. राजकारणी मात्र रामावरून केवळ राजकारण करत आहेत. सामान्यांनी मात्र यात न पडता, आपला दृष्टिकोन जागा ठेवून, विचार करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा SA vs IND 2nd test live: फलंदाजांच्या घोडचूकीमुळे भारताचा पराभव निश्चित; हे आहे आफ्रिकेच्या जिंकण्याचे गणित..

Men women relationship: पुरुष आणि महिला दोघांचे वीक पॉईंट माहिती असायलाच हवे; जाणून घ्या दोघांचेही वीक पॉईंट..

NHM Pune Recruitment: आरोग्य विभागात या उमेदवारांसाठी मेगा भरती; वाचा सर्व डिटेल्स..

mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.