NHM Pune Recruitment: आरोग्य विभागात या उमेदवारांसाठी मेगा भरती; वाचा सर्व डिटेल्स..

0

NHM Pune Recruitment: अलीकडच्या काळात नोकरी मिळवणं मोठं आव्हान असलं तरी काही विभागांमध्ये नोकरभरती केली जात आहे. त्यामुळे इच्छुक असणाऱ्या अनेक जणांना नोकरीची संधी देखील उपलब्ध होत आहे. जर तुम्ही देखील नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM Pune Recruitment) पुणे या ठिकाणी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 16 जानेवारी 2024 अगोदर अर्ज प्रक्रियेची पूर्तता करावी लागणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे या ठिकाणी केल्या जाणाऱ्या भरतीसाठी एकूण 364 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया या भरती प्रक्रियासंदर्भात सविस्तर अपडेट..

रिक्त पदाचे नाव/ शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी एकूण 120 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार हा एमबीबीएस (MBBS) असणे आवश्यक आहे. “स्टाफ नर्स” या पदासाठी एकूण 124 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही जीएनएम/ त्याचबरोबर बीएससी नर्सिंग यामध्ये पदवी संपादन केलेला असणे आवश्यक आहे.

बहुउद्देशीय आरोग्य सेवक” या पदासाठी एकूण 120 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता विज्ञान या विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स देखील होणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा/परीक्षा शुल्क/ पगार

इच्छूक आणि पात्र उमेदवारांचे वय 65 ते 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 300, मागासवर्गीय उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. “वैद्यकीय अधिकारी” या पदावर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 60,000 दरमहा, “स्टाफ नर्स” या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना 20,000 दरमहा आणि “बहुउद्देशीय आरोग्य सेवक” पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना दरमहा 18 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया/नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण हे पुणे या ठिकाणी असणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.pmc.gov.in/mr/recruitments असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे अधिकृत पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही या भरतीसाठी सविस्तर अर्ज करू शकता.

रतीची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.