mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?

0

mutton: भारतात 70 टक्क्यांहून अधिक लोक मांसाहार करतात. मांसाहारांमध्ये प्रामुख्याने चिकन, आणि मटणाचा समावेश असतो. मांसाहार करण्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक वाढते. आपल्याकडे प्रामुख्याने शेळी आणि बोकडाच्या मांसाला मटण म्हंटल जातं. मटन खाणाऱ्यांची संख्या मोठी केली असली तरी अनेकांना एकावेळी किती मटण खायला हवं? आणि मटणाचा कोणता भाग सर्वोत्तम आहे, याची माहिती नसते. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

भारतात मटन मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. दिवसातून दोन-तीन वेळा मटण खाणारी मंडळी देखील तुम्ही अनेकदा पाहिली असतील. मटणातला कोणता पार्ट हा सर्वाधिक चविष्ट असतो, याविषयी फारशी कोणाला माहितीही नसते. तसेच कोणत्या रंगाचे मटण हे चांगल्या दर्जाचं असतं, याची देखील अनेकांना कल्पना नसते.

मटणातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात. खास करून प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी मटणाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. सर्वेनुसार 100 ग्रॅम मटनामध्ये साधारण 33 ग्रॅम प्रोटीन असतं. प्रोटीन बरोबर मटणामध्ये 230 ते 240 च्या आसपास कॅलरीही मिळते. 100 ते 110 ग्रॅम कोलेस्ट्रॉल, दहा ग्रॅम कॅल्शियम, असे काही शरीरासाठी आवश्यक असणारे, घटकही मटनाच्या सेवनातून मिळतात.

जर तुम्ही मटण खात असाल, तर मटनाची निवड करताना नेहमी बोकडाचं किंवा शेळीचं वय लक्षात घेणे आवश्यक आहे. बोकड जास्त तरुण आणि म्हातारं देखील नसायला हवं. साधारण बारा ते वीस किलो वजना दरम्यान असणारं बोकड हे खाण्यासाठी सर्वोत्तम असल्याचं सर्व्हेतून समोर आला आहे. बोकडाचे मटण हे नेहमी लाल असायला हवं. पांढऱ्या मासांमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. शिवाय ते चवीला देखील चांगलं लागत नाही.

मटन खरेदी करताना नेहमी मांस आणि हाडांचा देखील समावेश करून मटण खरेदी करा. 70 टक्के मांस आणि तीस टक्के हाडे या स्वरूपात मटणाची खरेदी करा. अनेक जण बोकडाची मांडी खाणे पसंत करतात. मात्र मांडीबरोबर छातीचा काही भाग बरगड्या देखील तुमच्या मटनामध्ये असायला हव्यात. यकृताचाही काही भाग मटणात असेल, तर मटणाची चव अधिक वाढते.

मटन हे पचण्यासाठी खूप जड आहे. त्यामुळे मटण खाताना तुम्हाला मटणाची मर्यादा माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही मटण खाण्याचे कितीही शौकीन असला, तरी मटन हे तुम्हाला प्रमाणातच खायला हवं. अनेकजण मटन हे मुबलक प्रमाणात खातात. मात्र यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. मटणाच्या अधिक सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलची संख्याही वाढली जाते. त्यामुळे मटण खाताना तुम्ही 70 ते 100 ग्रॅम या दरम्यानच मटण खाणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा  Google pay New rules: 45 दिवसांसाठी Google pay आणि phone pay देणार आता उसने पैसे; जाणून घ्या रक्कम आणि प्रोसेस..

IND vs SA 2nd test Live: शुभमन गिलसह या दोन जणांना मिळणार डच्चू; पाहा दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Amruta Fadnavis video: मुली सोबत शुभेच्छा देणं अमृता फडणवीसांना पडलं महागात; नेमकं त्या व्हिडिओत आहे तरी काय.. 

T20 World Cup 2024: या दोन खेळाडूंशिवाय भारत T-20 World Cup जिंकूच शकत नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.