T20 World Cup 2024: या दोन खेळाडूंशिवाय भारत T-20 World Cup जिंकूच शकत नाही..

0

T20 World Cup 2024: 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी फार काही चांगलं राहिलं नाही. 2022 प्रमाणे 2023 या वर्षानेही भारतीय संघाला वर्ल्डकपची हुलकावणी दिली. 2022 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ विजेत्या बनण्यास लायक नव्हता. मात्र 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने इतर संघाच्या तुलनेत दमदार खेळ सादर केला. सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेशही केला. मात्र दबावाचा सामना करण्यात पुन्हा एकदा भारतीय संघ अपयशी ठरला. आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ दहाव्या वर्षीही कायम राहिला.

2023 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खराब राहिलं असलं तरी, 2024 मात्र नवीन आशेचा किरण घेऊन आला आहे. कारण 2024 मध्ये भारतीय संघाला t20 विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे 2024 मध्ये दहा वर्षाचा दुष्काळ संपवण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे. मात्र त्यासाठी संघ निवड देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. वेस्टइंडीजमध्ये विश्वचषक होणार आहे. (T20 world cup 2024 in West Indies) त्यामुळे फलंदाजासाठी तेथील खेळपट्टया आव्हानात्मक आहेत. संघात केवळ आक्रमक खेळाडूंचा भरणा समाविष्ट करूनही चालणार नाही.

वेस्टइंडीज मधील खेळपट्ट्या संथ असल्याने, फलंदाज आणि गोलंदाजांचा रोल देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विराट कोहली t20 विश्वचषकाचा भाग होणार नसल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र भारतीय संघाला 2024 मध्ये t20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर विराट कोहली (Virat kohli) शिवाय पर्याय नाही. ट्वेंटी विश्वचषकामध्ये विराट कोहलीने आत्तापर्यंत 12 अर्धशतके झळकावली आहेत.

टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये अनेक निसटलेले सामने विराट कोहलीने एकहाती जिंकून दिले आहेत. यामध्ये सेमी फायनल सारख्या नॉकआउट सामन्यांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 2022 च्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने जिंकून दिलेला सामना आजही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. आकडे, परफॉर्मन्स, सरासरी या सगळ्या गोष्टीत विराट कोहली सर्वोच्च स्थानी आहे.

वेस्टइंडीज मधील खेळपट्ट्या संथ असल्याने विराट कोहली त्या ठिकाणी एक्सफॅक्टर ठरणार हे उघड आहे. खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ करता येणे आवश्यक असतं. अनेक नवीन आक्रमक खेळाडू अशा खेळपट्ट्यांवर सातत्याने अपयशी ठरताना पाहायला मिळतात. जर t20 विश्वचषकात भारतीय संघाला दमदार कामगिरी करायची असेल, तर विराट कोहली (Virat Kohli) शिवाय दुसरा पर्याय नाही.

कोहली बरोबर भारतीय संघाला एका दमदार फिनिशिअरची आवश्यकता आहे. हार्दिक पांड्याचा (hardik Pandya) फिटनेस हा गेल्या अनेक वर्षांपासूनच मोठा चिंतेचा विषय राहिला आहे. त्यामुळे जरी त्याला t20 विश्वचषकात संधी मिळाली, तरी तो पूर्ण स्पर्धा खेळेल, हेही ठामपणे सांगता येत नाही. शिवाय हार्दिक पांड्याच्या जोडीला आणखी एक फिनिशर असायला हवा. रिंकू सिंहच्या (Rinku Singh) रूपात एक दमदार पर्याय भारतीय संघापुढे आहे.

एखाद्या सामन्यात भारतीय प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतरही रिंकू सिंह डावाची सूत्रे आपल्या हातात घेऊन डावाला आकार देऊ शकतो. तो काही सामनेच खेळला आहे. मात्र यामध्ये देखील त्याने हा करिष्मा करून दाखवला आहे. शेवटच्या षटकात अतिशी फटकेबाजीही करू शकतो. कितीही प्रेशर सिच्युएशन असली तरीही देखील रिंकू सिंह पॅनिक होताना दिसत नाही. त्यामुळे विराट कोहली बरोबर रिंकू सिंहचीही निवड केली, तरच भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.

हे देखील वाचा IND vs SA 2nd test Live: शुभमन गिलसह या दोन जणांना मिळणार डच्चू; पाहा दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Hit And Run Law: पेट्रोलचा तुटवडा का झाला निर्माण? काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर..

Chana Benefits: भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल; जाणून घ्या प्रमाण आणि फायदे..

David Warner: ऑस्ट्रेलिया संघात वादळ! ..म्हणून डेव्हिड वॉर्नरने कसोटी नंतर अचानक वनडेतूनही घेतली निवृत्ती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.