Hit And Run Law: पेट्रोलचा तुटवडा का झाला निर्माण? काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर..

0

Hit And Run Law: देशातील पेट्रोल पंपावर (petrol pump) वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची ही गर्दी असली तरी, पेट्रोल हे दररोज भरावेच लागते. मग अचानक पेट्रोल पंपावर वाहनाची गर्दी का वाढली? साहजिकच हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. या गर्दीचे कारणही खास आहे. केंद्र सरकारने हिट अँड रन (hit and run law) या कायद्यात दुरुस्ती केली, आणि याच कायद्या विरोधात वाहन चालक रस्त्यावर उतरले आहेत. ज्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. अजूनही समजलं नाही? जाणून घ्या सविस्तर प्रकरण..

केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात तीन कायद्यांमध्ये तरतुदी केल्या. यामध्ये हिट अँड रन याही कायद्याचा समावेश आहे. हिट अँड रन या कायद्यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. शिवाय पूर्वी या कायद्यात जमीनही मंजूर होत होता आता मात्र या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. अपघात झाला आणि त्यानंतर घटनास्थळावरून ड्रायव्हर पळून गेला, तर त्याला दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच पाच लाख रुपयांचा दंड देखील वसूल केला जाणार आहे.

केंद्र सरकारचा हा कायदा अन्यायकारक असल्याचं म्हणत, अनेक ट्रक संघटना आणि ट्रक ड्रायव्हर यांनी विरोध केला आहे. ठिकठिकाणी आंदोलन देखील केली जात आहेत. हा कायदा हा सर्व वाहन चालकांसाठी करण्यात आला आहे. मात्र आंदोलनामध्ये केवळ ट्रॅक संघटना आणि ट्रक ड्रायव्हर (truck driver protest) यांचाच समावेश आहे. याला देखील महत्त्वाचं कारण आहे.

देशात मोठ्या वाहनांच्या चालकांची संख्या ही 28 लाखाहून अधिक आहे. अनेकदा अपघात झाल्यानंतर, अवजड वाहनांनाच दोषी ठरवलं जातं. इतकच नाही तर अनेकदा अपघात झाल्यानंतर, संतप्त जमाव अवजड वाहनांच्या ड्रायव्हरांना मारहाण देखील करतात. अनेकदा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पळून जाणं पसंत करतात. आता मात्र हिट अँड रन या कायद्यात दुरुस्ती करून, पाच लाख रुपये दंड आणि दहा वर्षापर्यंत तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वी अपघात झाल्यानंतर, दोषी आढळणाऱ्या चालकांना दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती. शिवाय जामीनही मंजूर होत होता. आता मात्र या कायद्यात बदल करून हा अजामीनपात्र फौजदारी गुन्हा असेल, असं सांगण्यात आलं आहे. या कायद्याला विरोध म्हणून देशातल्या अनेक ट्रक संघटना आणि ट्रक ड्रायव्हर यांनीही संप पुकारला आहे.

या संपामध्ये डिझेल, पेट्रोल, गॅस वाहतूक करणाऱ्यांचा देखील समावेश आहे. साहजिकच त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार आहे. आणि म्हणून नागरिकांमध्ये मोठी संभ्रमता निर्माण झाली आहे. इंधन वाहतूक करणाऱ्यांनी देखील संप पुकारला असेल, तर आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणार नाही. परिणामी वाहनांशिवाय आपल्याला आपली कामे, प्रवास करावा लागेल. याच भीतीमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होताना दिसत आहे.

हे देखील वाचा Chana Benefits: भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल; जाणून घ्या प्रमाण आणि फायदे..

David Warner: ऑस्ट्रेलिया संघात वादळ! ..म्हणून डेव्हिड वॉर्नरने कसोटी नंतर अचानक वनडेतूनही घेतली निवृत्ती..

Rohit Sharma ची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का? आकडे पाहिल्यानंतर तुमचीही उडेल झोप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.