David Warner: ऑस्ट्रेलिया संघात वादळ! ..म्हणून डेव्हिड वॉर्नरने कसोटी नंतर अचानक वनडेतूनही घेतली निवृत्ती..

0

David Warner: कसोटी क्रिकेटनंतर (test cricket) आता डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली आहे. तीन तारखेपासून पाकिस्तान विरुद्ध सिडनी कसोटी नंतर डेव्हिड वॉर्नर निवृत्त होणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्नरने कसोटी बरोबर मी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. एकादिवसीय क्रिकेटमधूनही डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेट विश्वात आता खळबळ उडाली आहे. (David Warner announcing retirement test and ODI cricket)

सन्मानपूर्वक निवृत्ती व्हावी, यासाठी डेव्हिड वॉर्नरला सिडनी कसोटी नंतर मानवंदना दिली जाणार आहे. मात्र या निर्णयावर जॉन्सनने जोरदार टीका केली होती. बॉल टेम्परिंगच्या गुन्हेगाराला अशा प्रकारचा सन्मान देण्याची काहीही गरज नाही. जॉन्सनच्या प्रतिक्रियामुळे डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीची जोरदार चर्चाही झाली. मात्र आता अचानक डेव्हिड वॉर्नरने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचे जाहीर केल्याने, पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

मात्र जॉन्सनचा प्रतिक्रियाचा आणि डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीचा काहीही संबंध नाही. ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आपला जबरदस्त फॉर्म चालू असतानाही अचानक आश्चर्यकारक निवृत्ती जाहीर करतात. नवीन खेळाडूंना संधी मिळावी, हा देखील त्यामागचा उद्देश असतो. भारतीय क्रिकेट कल्चर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट कल्चर फार वेगळं आहे. भारतामध्ये जोपर्यंत क्रिकेट बोर्ड खेळाडूंना डच्चू देत नाही, तोपर्यंत खेळाडू निवृत्ती घेत नाहीत. ऑस्ट्रेलिया मात्र याला अपवाद आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्वतःहून योग्यवेळी निवृत्ती घेतात.

ऑस्ट्रेलियाने 2015 आणि 2023 मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाचा डेव्हिड वॉर्नर हा भाग राहिला आहे. या दोन्ही विश्वचषकामध्ये डेव्हिड वॉर्नरने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असती तरी वॉर्नर वेस्टइंडीजमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसणार आहे.

कसोटी क्रिकेट नंतर अचानक एकदिवसीय क्रिकेट मधूनही डेव्हिड वॉर्नरने का निवृत्ती घेतली, या विषयी आता उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. मिचेल जॉन्सनने केलेल्या विधानामुळे डेव्हिड वॉर्नर व्यथित झाला. आणि म्हणून त्याने वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. अशा प्रकारच्या कमेंट सोशल मीडियावर केला जात आहेत. मात्र दुसरीकडे असं काहीही नाही, जर असं असतं तर त्याने टी-ट्वेंटी क्रिकेटही सोडलं असतं, असंही बोललं जात आहे.

डेव्हिड व ॉर्नरने एक दिवशी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेकदा अविस्मरणीय इनिंग्ज खेळल्या आहेत. वॉर्नरची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी मोठा लॉस आहे. मात्र जर संघाला आगामी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये माझी गरज भासल्यास मी पुन्हा संघात परतण्यास तयार असल्याचं वॉर्नरने निवृत्ती जाहीर करताना केलं आहे.

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६९३२ धावा केले आहेत. सर्वाधिक धावांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सहावा खेळाडू ठरला आहे. तर सलामीवीर म्हणून गिलख्रिस्टच्या नंतर सर्वाधिक धावांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नर 2009 मध्ये आपल्या एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात केली होती. या सुरुवातीचा अंत त्याने 2023 चा वर्ल्ड कप जिंकून केला.

हे देखील वाचा Kl Rahul: World Cup पराभवानंतर केएल राहुलचे निवृत्ती विषयी विधान चर्चेत..

New year zodiac signs: या पाच राशींच्या लोकांवर 2024 मध्ये होणार धनालभाचा वर्षाव..

IND vs SA 2nd test: दुसऱ्या कसोटीत होणार तीन आश्चर्यकारक बदल; तरीही भारत पराभवाच्या तराजूतच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.