IND vs SA 2nd test: दुसऱ्या कसोटीत होणार तीन आश्चर्यकारक बदल; तरीही भारत पराभवाच्या तराजूतच..

0

IND vs SA 2nd test: कसोटी मालिका (test series) सुरू होण्यापूर्वी अनेकजण भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) पहिली कसोटी मालिका जिंकेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र आता या आशा धुळीस मिळाल्या आहेत. पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे पहिली कसोटी तीन दिवसही चालली नाही. त्यामुळे आता भारतीय संघाचा अप्रोच आणि परफॉर्मन्स दोन्हींवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

फलंदाजी, गोलंदाजी, आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघ प्रचंड साधारण वाटला. रोहित शर्माच्या नेतृत्वाचे अनेकदा अनेकांनी कौतुक केले आहे. मात्र यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून संपूर्ण कसोटीमध्ये कुठेही दिसला नाही. जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला खेळवण्याचा निर्णय देखील सपशेल चुकीचा ठरला.

पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे आता मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. परंतु भारतीय संघाचा खेळ पाहता, याची शक्यता फार कमी आहे. शिवाय दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फलंदाजांपेक्षा अधिक सरज वाटत आहे.

दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम मॅनेजमेंट संघात दोन मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फलंदाजीप्रमाणे भारतीय गोलंदाजी देखील पहिल्या कसोटीत प्रचंड साधारण राहिली होती. खासकरून शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा. या दोघांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे. दोघांच्या जागांवर आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

शार्दुल ठाकूर (shardul Thakur) प्रसिद्ध कृष्णा ऐवजी आवेश खान (aavesh khan) आणि मुकेश कुमार (mukesh kumar) यांना संधी दिली जाणार आहे. याशिवाय रवीचंद्रन अश्विनला (ravichandran Ashwin) देखील दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात येणार आहे. आश्विनच्या जागेवर रवींद्र (ravindra jadeja)  जडेजाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र गोलंदाजीमध्ये कितीही बदल केले, तरीही भारतीय संघ दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही. त्याचे कारण म्हणजे, गोलंदाजी पेक्षा भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आहे.

भारतीय संघाला दुसरी कसोटी जिंकायची असेल तर फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. जोपर्यंत भारतीय सलामीवीर नवीन चेंडू खेळून काढत नाहीत, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा सामना करता येणे अवघड आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे देखील लक्ष असणार आहे.

हे देखील वाचा Salman Khan: ..म्हणून मी एकाही चित्रपटात दिला नाही किसींग सीन; किसींग सीन्सवर सलमान खानची प्रतिक्रिया चर्चेत..

sandeep lamichhane: दिल्ली कॅपिटल संघात भूकंप! संघाला एकहाती सामने जिंकून देणारा खेळाडू रेप प्रकरणात दोषी..

Ram Charan meet CM Shinde: राम चरण भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नशेत? तोल जाणार तो व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.