Salman Khan: ..म्हणून मी एकाही चित्रपटात दिला नाही किसींग सीन; किसींग सीन्सवर सलमान खानची प्रतिक्रिया चर्चेत..
Salman Khan: सलमान खानचा (Salman Khan) नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (galaxy apartment) बाहेर च्याहत्यांनी सलमान खानला नेहमीप्रमाणे शुभेच्छा दिल्या. सलमान खानने वयाची 58 वर्षे पूर्ण केली. मात्र आजही सलमान खानचा फिटनेस विशीतल्या तरुणांनाही लाजवेल असाच आहे. सलमान खानचा बॉलीवूड इंडस्ट्रीवर (bollywood industry) असणारा दबदबा अनेकांना माहिती आहे.
सलमानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मात्र त्याने एकाही चित्रपटात किसिंग सीन दिला नाही. हेही अनेकांना माहिती आहे. मात्र त्याने आतापर्यंत किसिंग सीन का दिला नाही, याविषय मात्र कोणालाच माहिती नाही. आता त्याच्या चित्रपटात किसिंग सीन का नसतात? यावर सलमान खानने स्वतः माहिती दिली आहे.
अलीकडच्या काळामध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात इंटीमेट सीनचा भरणा पाहायला मिळतो. चित्रपट फ्लॉप जाऊ नये, म्हणूनच निर्माते आणि डायरेक्टर चित्रपटांमध्ये इंटीमेट सीनचा भरणा करतात. हे आता लपून राहिले नाही. मात्र सलमान खान याला अपवाद आहे. सलमान खानच्या चित्रपटात एकही किसिंग सीन नसला तरी देखील चित्रपट ब्लॉकबस्टर होतो.
आता या प्रकरणावर सलमान खानने स्वतः मौन सोडले आहे. मी किसिंग सीन देत नाही याचे कारण म्हणजे, मी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी किसिंग सीन करणार नाही, हे ठरवलं होतं. आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा इंग्रजी चित्रपट पाहायचो. हे चित्रपट आम्ही कुटुंबासोबत असताना पाहत होतो. जेव्हा किसिंग सीन यायचा तेव्हा सगळ्यांना अस्वस्थ वाटायचं. अशा वेळी आम्ही अनेकदा चित्रपट पाहताना उठून देखील जायचो.
मी माझे चित्रपट संपूर्ण कुटुंबांनी मिळून एकत्र पाहावे, अशा स्वरूपाचे बनवतो. त्यामुळे माझे चित्रपट पाहताना कुणालाही अस्वस्थ वाटू नये, याची मी खबरदारी घेतो. कोणत्याही चित्रपटामध्ये जेव्हा अशा सीनची गरज आहे, असं वाटत, तेव्हा तो करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ त्या पद्धतीने अक्टिंग करा. प्रेक्षक समजून जातील.
सलमान खान वॉन्टेड चित्रपटांमध्ये एक बार मैने कमिटमेंट कर दी, मैं अपने आप की भी नहीं सुनता, हा डायलॉग होता. आता या चित्रपटाप्रमाणे सलमान खानने बॉलीवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी नो किसिंग सीन ही कमिटमेंट केली होती, ती त्याने आजही कायम पाळली आहे.
हे देखील वाचा Ram Charan meet CM Shinde: राम चरण भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नशेत? तोल जाणार तो व्हिडिओ व्हायरल..
SA vs IND 1St test: कसोटी पराभवाला रोहित शर्मा जबाबदार; सामन्यात रोहीत शर्मा कुठे होता..
Acharya Chanakya thought: या सात जणांना झोपेतून चुकूनही उठवू नका; सहावा आहे, फारच भानायक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम