SA vs IND 1St test: कसोटी पराभवाला रोहित शर्मा जबाबदार; सामन्यात रोहीत शर्मा कुठे होता..

0

SA vs IND 1St test: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानिकारकरित्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिली कसोटी भारतीय संघाने केवळ तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 32 धावांनी गमावली. दोन्हीं डावात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. मात्र फलंदाजी व्यतिरिक्त भारतीय संघ या सामन्यात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतही दिसला नाही. कर्णधार म्हणून या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) कुठेही दिसला नाही. (South Africa beat India first test by inning and 32 runs)

भारतीय संघाला अद्याप दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ दोन्ही सामने जिंकून इतिहास रचेल अशी महत्वकांक्षा घेऊन मैदानात उतरला होता. परंतु तीन दिवसही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करू शकला नाही. क्रिकेटमध्ये कसोटी खेळणं प्रचंड आव्हानात्मक असतं. केवळ एक दिवस चांगला खेळ करून तुम्ही कसोटी जिंकू शकत नाही. पाचही दिवस तुमचा खेळ अपोझिशन संघापेक्षा दर्जेदार असावा लागतो.

टॉस दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना हा निर्णय चुकीचा वाटला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाने, आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिले. रबाडा व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या संघात एकही अनुभवी गोलंदाज नव्हता. मात्र तरी देखील भारतीय संघाच्या फलंदाजीचे कंबरडे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मोडून काढलं.

पहिल्या डावात केएल राहुलने दमदार शतक ठोकलं, तरीही भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 245 धावा करता आल्या. अनुभवी गोलंदाज नसतानाही भारतीय संघाच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दोन्ही गावात फलंदाजीत अपयशी ठरला. केवळ फलंदाजीतच नाही, तर रोहित शर्मा मैदानामध्ये कुठेही दिसला नाही.

दुसऱ्या दिवशी लंच नंतर जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देण्याऐवजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रसिद्ध कृष्णा (prasiddh Krishna) आणि शार्दुल ठाकूरला (shardul Thakur) गोलंदाजी दिली. रोहित शर्माच्या या निर्णयावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. विराट कोहली कर्णधार असताना मैदानामध्ये ज्या पद्धतीने एनर्जी घेऊन येत होता, तशा पद्धतीची एनर्जी रोहित शर्माकडून कुठेही दिसत नाही. बॉलिंग चेंजेसमध्ये देखील रोहित शर्मा प्रचंड साधारण दिसला.

योग्य वेळी बॉलिंग चेंजेस आणि मैदानामध्ये एनर्जी या गोष्टीत रोहित शर्मा कुठेही दिसला नाही. याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुरेपूर उठवला. गोलंदाजीमध्ये देखील रोहित शर्मा सलामीविर म्हणून दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या गावात केएल राहुल (kl Rahul) आणि दुसऱ्या डावात विराट कोहली (Virat Kohli) वगळता भारताच्या एकही फलंदाजाला मैदानात टिकता आले नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर पहिल्या कसोटीच्या पराभवाला रोहित शर्मा जबाबदार आहे, हे वास्तव लपवता येणार नाही.

हे देखील वाचा PM Kisan 16th Installment: सोळाव्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर; तरच मिळणार 16 वा हप्ता, जाणून अधिक..

IND vs SA 1St test: रोहित शर्माच्या त्या गाढव चुकीमुळे भारत पहिल्या कसोटीत पराभवाच्या छायेत..

Ajit pawar vs Amol kolhe: ..म्हणून अजित पवारांना फुल कॉन्फिडन्स; काय आहे शिरूर लोकसभेचे गणित? खरचं कोल्हे पडतील?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.