Ram Charan meet CM Shinde: राम चरण भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नशेत? तोल जाणार तो व्हिडिओ व्हायरल..

0

Ram Charan meet CM Shinde: शिवसेना पक्ष फोडल्यानंतर, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री शिंदे जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत, तेव्हापासून या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. मुख्यमंत्री एकनाथ (eknath shinde) शिंदेसह 16 आमदाराच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून देखील ते सध्या चर्चेत आहेत. 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना सोळा आमदाराच्या अपात्रते संदर्भात निकाल द्यायचा आहे. हा निकाल शिंदे यांचे भवितव्य काय असेल, हे देखील ठरवणार असल्याने, सध्या ते चर्चेत आहेत.

सोळा आमदाराच्या अपात्रते पूर्वी शिवसेनेतून फुटून गेलेले आमदार भाजपमध्ये विलीन होणार असल्याचीही बातमी प्रसारित झाली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात नक्की काय होणार? याविषयी प्रचंड संभ्रमता आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. कधी ते आपल्या शेतात हेलिकॉप्टरने उतरून शेती करताना दिसतात. तर कधी ट्रॅक्टर घेऊन समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करण्यासाठी जातात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक सेलिब्रिटींना आपल्या घरी बोलवताना देखील पाहायला मिळतात. गणपती उत्सवामध्ये एकनाथ शिंदे यांनी बिग बॉस ओटीपी स्पर्धेचा विनर अल्विष यादवला देखील आपल्या घरी बोलावलं होतं. काही दिवसांपूर्वी टॉलीवूड सुपरस्टार राम चरण (ram charan) यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रामचरण आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नुकताच वायरल झाला आहे. सचिन त्रिंबक या नावाच्या ट्विटर आयडीवरून एकनाथ शिंदे आणि राम चरण यांच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे नशेत असल्याचं सचिन त्रिंबक यांनी म्हटले आहे.

सचिन त्रिंबक यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायऱ्यावरून खाली उतरून येताना पाहायला मिळत आहे. मात्र खाली उतरत असताना त्यांचा तोल देखील जात असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना, सचिन त्रिंबक म्हणतात, थोड़ी सी तो पी ली है, चोरी तो नही की है!

हे देखील वाचा SA vs IND 1St test: कसोटी पराभवाला रोहित शर्मा जबाबदार; सामन्यात रोहीत शर्मा कुठे होता..

Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

WTC Point table: जिंकणं सोडा, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ WTC final पर्यंतही पोचू शकत नाही..

PM Kisan 16th Installment: सोळाव्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर; तरच मिळणार 16 वा हप्ता, जाणून अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.