WTC Point table: जिंकणं सोडा, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ WTC final पर्यंतही पोचू शकत नाही..

0

WTC Point table: दक्षिण आफ्रिके विरुद्ध काल भारताला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना तीन दिवसही करू शकला नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि कॅप्टनशिपमध्येही भारतीय संघ कुठेही दिसला नाही. केएल राहुल (kl Rahul) आणि विराट कोहली (Virat kohli) वगळता भारतीय फलंदाजांच्या परफॉर्मन्सनंतर ते मैदानात खरंच फलंदाजी करण्यासाठी आले होते का? हाही प्रश्न निर्माण झाला आहे.

2022 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला असला, तरी फायनल पर्यंत पोहोचवण्याचे काम विराट कोहलीने केले होते. विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियात भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले. कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विराट कोहलीच्या कर्णधारापदाची झलक ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाली. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.

कसोटीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तीच एनर्जी आणि तोच उत्साह विराट कोहलीचा नेतृत्वात भारतीय संघात दिसून येत होता. सामन्यात भारतीय संघ कितीही पाठीमागे असला तरी शेवटपर्यंत लढायचं हे विराटच्या नेतृत्वात स्पष्टपणे जाणवत होतं. ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीने त्यांनाच डोळे दाखवून सिरीज जिंकण्याचा कारणामाही करून दाखवला आहे.

कसोटी क्रिकेट हे माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेट असल्याचं विराटने अनेकदा बोलून दाखवलं. केवळ बोलूनच नाही, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा कारणामाही करून दाखवला. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात दमदार कामगिरी केली. त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत झालेल्या, दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पर्यंत भारतीय संघ पोहोचला.

विराट कोहली नंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मात्र भारतीय कसोटी संघ मैदानामध्ये कुठेही आक्रमकपणे खेळताना दिसत नाही. कसोटीत बॉलिंग चेंजेसमध्ये देखील रोहित शर्मा साधारण दिसतो. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडचा संपूर्ण संघ 60 षटकात बाद करत ऐतिहासिक कसोटी जिंकली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये ही भारतीय संघ पाकिस्तान, बांगलादेश आणि न्युझीलंड संघाच्याही खाली आहे.

शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पर्यंत पोहोचेल असं कुठेही दिसत नाही. आकडे देखील हे स्पष्ट सांगतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ सोळा गुन्हासह पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात न्युझीलंड संघानेही भारतामध्ये येऊन सिरीज बरोबरीत सोडली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात अनेक त्रुटी आहेत, मात्र त्याच्या लीडरशिपवर फारसी चर्चा केली जात नाही.

हे देखील वाचा SA vs IND 1St test: कसोटी पराभवाला रोहित शर्मा जबाबदार; सामन्यात रोहीत शर्मा कुठे होता..

PM Kisan 16th Installment: सोळाव्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर; तरच मिळणार 16 वा हप्ता, जाणून अधिक..

आढळराव-पाटीलांच नाव घ्यायलाही घाबरतायत अमोल कोल्हे! पहा काय आहे प्रकरण

Ajit pawar vs Amol kolhe: ..म्हणून अजित पवारांना फुल कॉन्फिडन्स; काय आहे शिरूर लोकसभेचे गणित? खरचं कोल्हे पडतील?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.