आढळराव-पाटीलांच नाव घ्यायलाही घाबरतायत अमोल कोल्हे! पहा काय आहे प्रकरण

0

“व्हाय आय किल्ड गांधी” या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यानंतर महाराष्ट्रभरातून अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. विरोधकांबरोबरच आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांनी अमोल कोल्हे यांना खडे बोल सुनावल्याचे पाहायला मिळाले होते. “नथुराम गोडसे” प्रकरण थंड होत आहे, तोवरच अमोल कोल्हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे गेले काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. 2017 साली “व्हाय आय किल्ड गांधी” या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यानंतर अमोल कोल्हे यांच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ आली. नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं पहिला मिळाले, सोशल मीडियावर अमोल कोल्हे ट्रेंड देखील झाले. हीच बाब लक्षात घेऊन अमोल कोल्हे यांनी आळंदीला जाऊन ‘आत्मक्लेश’ केले.

अमोल कोल्हे यांनी ‘आत्मक्लेश’ केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र आता पुन्हा नाव वाद निर्माण झाला आहे. त्याचे झाले असे, नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२/२३चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना, अमोल कोल्हे यांनी “खोदा पहाड निकला चूहा” असं कॅप्शन देत टीका केली. अमोल कोल्हे यांच्या या टीकेला ‘देवाशिष कुलकर्णी’ या ट्विटर यूजर्सने उत्तर दिले.

अमोल कोल्हे यांच्या टीकेला उत्तर देताना देवाशिष कुलकर्णी यांनी अमोल कोल्हेंना रिट्वीट करत रस्त्याचा एक फोटो ट्वीट केला. आणि म्हटलं, माननीय खासदार हा तुमच्या शिरुर मतदारसंघातील थेऊरला जायचा रस्ता आहे. खासदार म्हणून काम करायचंच नाही, आणि त्यामुळे रस्ता असा आहे. थेऊरला थोरल्या माधवराव पेशव्यांचे स्मारक आहे म्हणून? या रस्त्याची अवस्था बघा आणि यासाठी आत्मक्लेष करा. ते पहाड, चॅूंहा वगैरे राहू द्यात. असं देवाशिष कुलकर्णी नावाच्या एक ट्विटर यूजर्सने म्हटलं.

देवाशिष कुलकर्णी यांच्या टिकेला उत्तर देताना,अमोल कोल्हेंनी देखील चांगलाच समाचार घेतला, मात्र ही टीका करत असताना त्यांनी आढळराव पाटील यांचे नाव घेणं टाळल्याने पुन्हा एकदा चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. देवाशिष कुलकर्णी यांच्या टिकेला उत्तर देताना, अमोल म्हणाले,थेऊर ते थेऊर फाटा हा रस्ता अष्टविनायक गणपती जोडणारा मार्ग असून, त्यासाठी राज्य शासनाने हायब्रीड अॅन्युईटी योजनेंतर्गत मंजूर आहे. मात्र श्री रोहिदास मल्हारी कंद व अन्य स्थानिक शेतकऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेवरील सुनावणी कोविडमुळे होऊ शकलेली नाही. या संदर्भातील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (हॅम) यांची टिपणी माहितीसाठी जोडली आहे.’खोदा पहाड और निकला चुहाँ भी नहीं’ ही माझी प्रतिक्रिया आपल्या खूपच जिव्हारी लागलेली दिसतेय. त्यामुळे तुमचा त्रागा मी समजू शकतो. तसेच मागील ५ वर्ष भाजपाचे सरकार व आमदार असताना आपण त्यांना अशाप्रकारे जाब विचारल्याचे ऐकिवात नाही.

देवाशिष कुलकर्णी यांच्या टिकेला उत्तर देताना,अमोल कोल्हे यांनी पाठीमागे पाच वर्षांपूर्वी भाजपचे सरकार होते, भाजपचाच आमदार होता, असं म्हणाले, मात्र त्यांनी शिरूर मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील होते, असा उल्लेख करणं टाळल्याचे दिसून आले. खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उल्लेख न केल्याने खासदार अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील, यांचे नाव घ्यायलाही घाबरतात, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्याचे दिसून आले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.