sandeep lamichhane: दिल्ली कॅपिटल संघात भूकंप! संघाला एकहाती सामने जिंकून देणारा खेळाडू रेप प्रकरणात दोषी..

0

sandeep lamichhane: एखाद्या खेळाडू कितीही चांगला असला तरी तो माणूस म्हणून चांगला असेलच, असं अजिबात नसतं. याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. क्रिकेटचे मैदान एक हाती गाजवणारे असंख्य खेळाडू मैदानाबाहेर आपल्या वर्तनामुळे सातत्याने माध्यमांची हेडलाईन बनून असतात. अनेक खेळाडू खेळाचे मैदान गाजवतात. त्यामुळे साहजिकच त्याची चर्चा देखील होती. मात्र काही खेळाडूंची त्याहून अधिक चर्चा मैदानाबाहेरच्या कारनाम्यामुळे देखील होती.

अशीच एक घटना सध्या क्रिकेट वर्तुळात घडली आहे. खरंतर ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेणारी घटना आहे. नेपाळचा क्रिकेटर संदीप लाम‍िछाने यांना काठमांडू कोर्टाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. संदीप लाम‍िछाने हा आयपीएलमध्ये (ipl ) खेळणारा एकमेक नेपाळी क्रिकेटर होता. दिल्ली कॅपिटल (Delhi capitals) संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. दिल्ली कॅपिटल संघाला त्याने आपल्या फिरकीच्या माध्यमातून अनेक एकहाती सामने जिंकून दिले होते.

अनेक स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरच्या वर्तनामुळे चर्चेत असतात. ड्रंक अँड ड्राईव्ह, मारहाण, अशी अनेक प्रकरणे अनेक क्रिकेटर सोबत घडली आहेत. मात्र नेपाळच्या (Nepal ) संदीप लाम‍िछानेने मात्र माणुसकीला काळीमा फासणारे कृत केले आहे. काठमांडू (Kathmandu) मधील एका हॉटेलमध्ये 17 वर्षीय मुलीचा बलात्कार केल्याचा आरोप ऑगस्ट 2022 मध्ये करण्यात आला होता. अरोपानंतर त्याला अटक देखील केली होती. मात्र जानेवारी 2023 मध्ये त्याला जामिनावर सोडण्यात आले.

आता मात्र काठमांडू कोर्टाने त्याला या प्रकरणात दोषी ठरवलं असून, पुढच्या सुनावणीमध्ये त्याला शिक्षेचा कालावधी निश्चित केला जाणार आहे. 2018 मध्ये संदीपने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना त्याने अनेक आव्हानात्मक परिस्थितीतून दिल्ली संघाला सामने जिंकून देण्याचा करिष्मा देखील केला होता. आता मात्र संदीपच्या क्रिकेट करिअरला खीळ बसली असून, एक प्रकारे त्याचे करिअर आणि आयुष्य देखील उध्वस्त झालं आहे.

संदीप लाम‍िछाने हा केवळ 22 वर्षाचा आहे. तो एक लेगस्पिनर असून, आपल्या फिरकीच्या जाळ्यात त्याने अनेक दिग्गजांची शिकार देखील केली आहे. मात्र निंदनीय कृत्यामुळे त्याच्या करिअरला आता कायमची खीळ बसली आहे. किमान आयपीएलमध्ये तरी आता तो पुन्हा परतण्याची शक्यता फार कमी आहे. उत्कृष्ट खेळाडू व्हायचं असेल, तर केवळ टॅलेंट असून चालत नाही. तुमचं वर्तन देखील उत्तम असावं लागतं.

हे देखील वाचा Ram Charan meet CM Shinde: राम चरण भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नशेत? तोल जाणार तो व्हिडिओ व्हायरल..

SA vs IND 1St test: कसोटी पराभवाला रोहित शर्मा जबाबदार; सामन्यात रोहीत शर्मा कुठे होता..

IND vs SA 1St test live: सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; असा असेल संघ पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.