Kl Rahul: World Cup पराभवानंतर केएल राहुलचे निवृत्ती विषयी विधान चर्चेत..

0

Kl Rahul: भारतीय संघाचा उपकर्धार केएल राहुलने (kl Rahul) निवृती विषयी केलेले विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सलग दहा सामने जिंकूनही भारतीय संघाला वर्ल्डकप ट्रॉफी (world Cup trophy) जिंकता आली नसल्याने, खेळाडूबरोबर चाहत्यांची देखील प्रचंड निराशा झाली.

2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये देखील भारतीय संघाला अनपेक्षित सेमी फायनलमध्ये पराभव पहावा लागला होता. न्युझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर माफक धावांचे आव्हान ठेवले. मात्र तरी देखील भारतीय संघाला 240 धावांचे आव्हान पेलवले नाही. 2019 आणि 2023 या दोन्ही विश्वचषकामध्ये झालेल्या पराभवानंतर राहूलने केलेले विधान चर्चेत आहे.

राहुल म्हणाला, ज्याप्रमाणे आम्हाला 2019 मध्ये पराभव होईल, असं वाटलं नव्हतं, तसचं 2023 मध्ये देखील वाटत नव्हतं. मात्र वर्ल्ड कपमध्ये आम्हाला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. हे आमच्यासाठी प्रचंड वेदनादायी होते. तुम्ही कितीही चांगला खेळ केला, किती तुम्ही कितीही मालिका जिंकल्या, किती धावा केल्या, तरी त्या लक्षात राहत नाहीत. तुमच्याकडे वर्ल्ड कप ट्रॉफी नसेल, तर या गोष्टींना काहीही अर्थ नसतो. लोकं तुमचा खेळ आणि तुम्हाला विसरूनही जातात.

तुम्ही तुमच्या करिअरमध्ये भले कितीही मालिका जिंकल्या असतील, अनेक धावा केल्या असतील, मात्र तुमच्याकडे वर्ल्ड कप ट्रॉफी नसेल, तर निवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही कोणाच्याही लक्षात राहत नाही. असं मोठं विधान केएल राहुलने केलं आहे. केएल राहुलचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.

केएल राहुलच्या टॅलेंटचे अनेक दिग्गजांकडून अनेकदा मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येतं. मात्र केएल राहुलला आपल्या टॅलेंटला साजशा खेळ अद्यापही करता आलेला नाही. अनेकदा महत्त्वाच्या सामन्यात केएल राहुल सातत्याने अपयशी ठरताना पाहायला मिळाला आहे. अलीकडे मात्र हा समज केएल राहुलने काही प्रमाणात पुसण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत राहुलने पहिल्या डावात दमदार शतक देखील ठोकलं होतं.

हे देखील वाचा New year zodiac signs: या पाच राशींच्या लोकांवर 2024 मध्ये होणार धनालभाचा वर्षाव..

IND vs SA 2nd test: दुसऱ्या कसोटीत होणार तीन आश्चर्यकारक बदल; तरीही भारत पराभवाच्या तराजूतच..

Salman Khan: ..म्हणून मी एकाही चित्रपटात दिला नाही किसींग सीन; किसींग सीन्सवर सलमान खानची प्रतिक्रिया चर्चेत..

sandeep lamichhane: दिल्ली कॅपिटल संघात भूकंप! संघाला एकहाती सामने जिंकून देणारा खेळाडू रेप प्रकरणात दोषी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.