Amruta Fadnavis video: मुली सोबत शुभेच्छा देणं अमृता फडणवीसांना पडलं महागात; नेमकं त्या व्हिडिओत आहे तरी काय.. 

0

Amruta Fadnavis video: माजी मुख्यमंत्री आणि गृहमंतत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस सोशल मीडियावर मुक्तपणे आपले विचार मांडताना अजिबात संकोच करत नाहीत. अनेकदा यामुळे त्यांच्यावर टीका देखील केली जाते. मात्र तरीही टीकाकारांच्या मानगुटीवर बसून अमृता फडणवीस आपलं वेगळेपण दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न करतात.

नवीन वर्षा निमित्त शुभेच्छा देत असताना अमृता फडणवीस यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या नेहमीच्या स्टाईलने अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा हटके अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आता या शुभेच्छामुळे त्यांना ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागला आहे.

तसं पाहायला गेलं, तर अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल करण्यात येते. मात्र घाबरून न जाता, अमृता फडणवीस आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येतात. अमृता फडणवीस यांना त्यांच्या आवाजावरून देखील अनेकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. मात्र त्या या सगळ्यांना न जुमानता प्रेक्षकांच्या भेटीला आपली गाणी नेहमी घेऊन येतात.

अमृता फडणवीस यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी हटके अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यामुळे आता त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. या शुभेच्छा त्यांनी आपली मुलगी दिविजा (divija fadanvis) सोबत दिल्या. “so beautiful so elegant just looking like a wow , happy new year” असं म्हणत त्यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. अमृता फडणवीस यांच्या या शुभेच्छाला मुलगी दीविजा हीने देखील साथ दिली.

भाजपकडून नेहमी भारतीय संस्कृती जोपासण्याचा सल्ला दिला जातो. महिलांनी कपाळी टिळा लावायला हवा, डोक्यावर पदर घ्यायला हवा, असं भाजपचे आमदार, खासदार अनेकदा बोलताना पाहायला मिळतात. स्वतः रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा (Rivaba Jadeja) ही देखील आमच्या सनातन धर्मात डोक्यावर पदर घ्यायला शिकवलं आहे.

लहानपणापासून आम्ही याची जोपासना करतो, असंही त्या म्हणतात. मात्र या सगळ्यांना छेद देत अमृता फडणवीस नेहमी महिलांसाठी एक नवा आदर्श घालून देताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. आता नवीन वर्षातही त्यांना टीकेचा सामना करावा लागला आहे.

हे देखील वाचा IND vs SA 2nd test Live: शुभमन गिलसह या दोन जणांना मिळणार डच्चू; पाहा दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

T20 World Cup 2024: या दोन खेळाडूंशिवाय भारत T-20 World Cup जिंकूच शकत नाही..

Hit And Run Law: पेट्रोलचा तुटवडा का झाला निर्माण? काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर..

Chana Benefits: भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल; जाणून घ्या प्रमाण आणि फायदे..

David Warner: ऑस्ट्रेलिया संघात वादळ! ..म्हणून डेव्हिड वॉर्नरने कसोटी नंतर अचानक वनडेतूनही घेतली निवृत्ती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.