Google pay New rules: 45 दिवसांसाठी Google pay आणि phone pay देणार आता उसने पैसे; जाणून घ्या रक्कम आणि प्रोसेस..

0

Google pay New rules: अलीकडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळते. अनेकजण यूपीआयच्या माध्यमातून आपले व्यवहार पूर्ण करतात. UPI च्या माध्यमातुन अगदी एक रुपयापासून लाखों पर्यंतचे व्यवहार केवळ काही सेकंदामध्ये कोणीही कुठेही करू शकतो. अलीकडच्या काळात हे माध्यम प्रचंड प्रभावी ठरत आहे. एक जानेवारीपासून आता यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल देखील करण्यात आले आहेत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने (NPCI) एक जानेवारीपासून यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. जर तुम्ही देखील युपीआय वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने एक जानेवारीपासून यूपीआय पेमेंट प्रक्रियेमध्ये पाच बदल केले आहेत. पाचही बदल आपण थोडक्यात सविस्तरपणे जाणून घेऊ.

नियम पहिला

तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम, भारत पे, किंवा इतर कोणतेही यूपीआय वापरत असाल, आणि तुम्ही पहिल्यांदाच नवीन नंबरवर पेमेंट केलं असेल, पेमेंटची रक्कम दोन हजार असेल, तर पहिल्या पेमेंटची प्रक्रिया चार तासानंतर पूर्ण होणार आहे. एवढेच नाही, तर या चार तासाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला पेमेंटची रक्कम बदलायची असेल, तरी देखील बदलता येणार आहे. शिवाय चार तासांच्या कालावधीत पेमेंट थांबवण्याची सुविधा देखील या नियमानुसार देण्यात आली आहे.

नियम दुसरा

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने एका दिवसात व्यवहार करण्याच्या रकमेत वाढ केली आहे. पूर्वी 48 तासांमध्ये ग्राहकांना एक लाख रुपये पर्यंत व्यवहार करता येत होते. आता मात्र ही मर्यादा 24 तासांची करण्यात आली आहे.

तिसरा नियम

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने यूपीआय वापरकर्त्यांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. UPI ग्राहकांना यापूर्वी एका दिवसात केवळ एक लाख रुपयांचा व्यवहार करता येत होता. आता मात्र ही रक्कम पाच लाख रुपये करण्यात आली आहे. परंतु केबल शैक्षणिक संस्था, रुग्णालय यांसाठीची ही सुविधा उपलब्ध असणार आहे. इतर यूटीआय वापरकर्ते याचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

चौथा नियम

पेमेंट कॉर्पोरेशनने सगळ्यात महत्वपूर्ण बदल केला आहे, तो म्हणजे आता यूपीआय वापरणाऱ्यांना 45 दिवसांसाठी व्याज उपलब्ध असेल. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसतील, तरीदेखील UPI Now या द्वारे तुम्ही 45 दिवसांसाठी मर्यादेत रकमेचे व्यवहार करू शकता. व्याजाची रक्कम तुमचा इन्कम आणि व्यवहारावर अवलंबून असणार आहे. घेतलेल्या व्याजावर कोणत्याही प्रकारचे कर आकारण्यात येणार नाहीत.

हे देखील वाचा Amruta Fadnavis video: मुली सोबत शुभेच्छा देणं अमृता फडणवीसांना पडलं महागात; नेमकं त्या व्हिडिओत आहे तरी काय.. 

IND vs SA 2nd test Live: शुभमन गिलसह या दोन जणांना मिळणार डच्चू; पाहा दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

T20 World Cup 2024: या दोन खेळाडूंशिवाय भारत T-20 World Cup जिंकूच शकत नाही..

Hit And Run Law: पेट्रोलचा तुटवडा का झाला निर्माण? काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.