GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..

0

GPay Loan: यूपीआय पेमेंटमुळे व्यवहार करणं आता प्रचंड सोयीस्कर झालं आहे. देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही कुठेही सहज पैसे ट्रान्सफर करू शकता. एक रुपया पासून लाखो रुपयांपर्यंत व्यवहार तुम्ही UPI पेमेंटच्या माध्यमातून करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने (NPCI) नवीन वर्षापासून यूपीआयमध्ये अनेक नवीन सुविधा देखील लागू केल्या आहेत. जाणून घेऊया या नियमाविषयी सविस्तर..

एक जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने यूपीआय वापरकर्त्यांसाठी खास सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही नवीन नंबरवर दोन हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम पाठवली, तर ती रक्कम चार तासानंतर ट्रान्सफर केली जाणार आहे. या चार तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही रक्कम चेंज देखील करू शकता. इतकच नाही तर पेमेंट कॅन्सल देखील करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

यूपीआय वापरकर्त्यांना पूर्वी एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येत होते. आता मात्र यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता यूपीआय वापरकर्त्यांना एका दिवसात पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे. मात्र ही सुविधा केवळ शैक्षणिक संस्था, त्याचबरोबर रुग्णालये यांनाच देण्यात आली आहे. इतर यूपीआय वापरकर्त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

Gpay ची नवी योजना..

जर तुम्ही गुगल पे (Google pay) वापरकर्ते असाल, तर तुमच्यासाठी गुगलपे ने एक भन्नाट योजना लागू केली आहे. गुगल पेच्या माध्यमातून तुम्हाला आता लोन घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. गुगल पे (Google Pay loan) कडून दिल्या जाणाऱ्या लोनची रक्कम पंधरा हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या लोनचा कालावधी देखील निश्चित करण्यात आला आहे. ग्राहकांना सात दिवसापासून एक वर्षापर्यंत गुगल पे लोन देत आहे. जाणून घेऊया लोन घेण्याची सविस्तर प्रोसेस..

असं फेडावे लागेल कर्ज..

गुगल पेने आपल्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी DMI Finance यांच्याशी भागीदारी देखील केली आहे. गुगल पे कडून देण्यात आलेले लोन गुगल पे वापरकर्त्यांना कमीत कमी 111 रुपये हप्त्याचा माध्यमातून फेडायचे आहे. जर तुमची रक्कम एक लाख रुपये असेल, तर तुम्हाला एका वर्षामध्ये एक लाख रुपये फेडणे बंधनकारक असणार आहे. यासाठी दरमहा तुम्ही किती रुपयाचा हप्ता तुम्ही फेडू शकता, याचे गणित बांधून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हे कर्ज कसे मिळवायचे हे सविस्तर जाणून घेऊ..

कर्जासाठी या टिप्स फॉलो करा..

तुम्हाला गुगल पे कडून लोन हवं असेल, तर तुम्हाला ‘Google Pay for Business’ हे ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या ॲपवर तुमचे खाते काढावे लागणार आहे. Google Pay for Business वर खाते काढल्यानंतर, loans या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘ऑफर्स’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी रक्कम हवी आहे, ती रक्कम निवडून ‘Get start’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Get start या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला कर्ज देणाऱ्या DMI Finance वेबसाईटवर घेऊन जाण्यात येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचे लॉगिन करायचे आहे. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे. कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी देखील या ठिकाणी ठरवायचा आहे.

यानंतर तुमच्या कर्जावरती तुमची ई-स्वाक्षरी करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली काही ईकेवायसी कागदपत्रे सबमिट करावी लागणार आहेत. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला EMI पेमेंटकरीता Setup eMandate किंवा Setup NACH या दोन पैकी एका पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही EMI रक्कम टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाईल. My loan या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला मिळालेल्या कर्जाची स्थितीही तपासू शकता.

हे देखील वाचा Google pay New rules: 45 दिवसांसाठी Google pay आणि phone pay देणार आता उसने पैसे; जाणून घ्या रक्कम आणि प्रोसेस..

Test Cricket Future: आयपीएलमुळे टेस्ट क्रिकेटचा झाला सत्यानाश; भारतीय टेस्ट संघाचं भविष्यही धडकी भरवणारं..

Flipkart Big Bachat Dhamaal Sale : होय smartphone, laptop, earbuds खरेदीवर 80 टक्के सूट..

IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.