IND vs AFG T20I Squad : केएल राहुलचे T20 करिअर संपुष्टात; विराट रोहितचा दरारा कायम..

0

IND vs AFG T20I Squad : आगामी t20 विश्वचषकाच्या दृष्टीने अफगाणिस्तान विरुद्ध होणारी टी-ट्वेंटी सिरीज (India vs Afghanistan T20 series) प्रचंड महत्त्वाची आहे. महत्त्वाचं म्हणजे, 2024 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच भारतीय टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार असणार आहे. याबरोबरच विराट कोहली (Virat kohli) देखील t20 संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन t20 सामन्यांच्या मालिकेत या दोघांनाही निवडून निवड समितीने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

2022 नंतर टी ट्वेंटी क्रिकेट पासून रोहित आणि विराट कोहलीला बाजूला करण्यात आलं. हार्दिक पांड्याकडे टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व देखील देण्यात आले. अनेक t-20 मालिकांमधून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ठीकठाक कामगिरी देखील केली. मात्र हार्दिक पांड्याची दुखापत हा चिंतेचा मोठा विषय असल्याने, पुन्हा एकदा भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे.

11 जानेवारीपासून होणाऱ्या तीन t20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी केएल राहुलला (kl Rahul) मात्र डच्चू देण्यात आला आहे. राहुल बरोबर श्रेयस अय्यर देखील भारतीय टी-ट्वेंटी संघात नसणार आहे. 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर भारतीय टी-ट्वेंटी संघात यापुढे विराट कोहलीला संधी दिली जाणार नसल्याचे अनेक रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. मात्र या सगळ्याला आता खीळ बसली असून विराट पुन्हा एकदा t20 क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

11 जानेवारीपासून अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या t20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली गेली आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या (Hardik pandya) सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) हे दोघे टी-ट्वेंटी सिरीजचा भाग होणार नाहीत. रोहित शर्मा या मालिकेत कर्णधार पदाची देखील भूमिका बजावणार आहे. रोहित आणि विराट या दोघांची t20 संघात एन्ट्री झाल्याने, आता आगामी टी ट्वेंटी विश्वचषकात देखील हे दोघे क्रिकेट चाहत्यांना खेळताना दिसणार आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची t20 संघात वापसी झाली आहे. मात्र केएल राहुलला मात्र संधी देण्यात आली नाही. राहुलकडे सगळे शॉट्स आहेत. त्याच्याकडे जबरदस्त टॅलेंटही आहे. मात्र त्याच्या अप्रोचवर अनेकजण टीका करतात. केएल राहुल महत्त्वाच्या सामन्यात वारंवार अपयशी ठरल्याचे पाहायला मिळते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून, आता त्याला T20 संघातूनही वगळण्यात आलं आहे. जबरदस्त टॅलेंट असून देखील केएल राहुलचा अप्रोच व्यवस्थित नसल्याने, त्याला त्याच्यावर अनेकदा टीका केली जाते.

2022 नंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा एकही t20 सामना खेळले नाहीत. त्यामुळे या दोघांचे t-20 करिअर संपुष्टात आले असल्याच्या अनेक बातम्या प्रसारित देखील झाल्या. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांनाही t20 संघात संधी दिली गेली आहे. टी-ट्वेंटी संघात रोहित आणि विराटला संधी मिळाल्यामुळे या दोघांचा आजही भारतीय क्रिकेटमध्ये दरारा कायम असल्याचे म्हटलं जात आहे.

हे देखील वाचा Aishwarya Rai Abhishek Bachchan divorce : ऐश्वर्या रायने सोडलं घर! अभिषेक सोबतच्या घटस्फोटावरही करणार खुलासा..

GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..

IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..

Test Cricket Future: आयपीएलमुळे टेस्ट क्रिकेटचा झाला सत्यानाश; भारतीय टेस्ट संघाचं भविष्यही धडकी भरवणारं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.