cumin side effects: तुम्हीही सतत भाजीत जिरे टाकता? थांबा, जाणून घ्या जिऱ्याच्या सेवनाचा आरोग्यावर होणारा परिणाम..

0

cumin side effects: भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात मसाल्याचं सेवन केलं जातं. भाज्यांना चव आणण्यासाठी विविध प्रकारचे मसाले टाकण्याचे प्रमाण भारतामध्ये अधिक पाहायला मिळतं. इतर मसाल्यांबरोबर अनेक जण भाजीत जिरे देखील मोठ्या प्रमाणात टाकतात. भाजी बरोबर अनेकांना जिऱ्याचं पाणी नियमितपणे सेवन करण्याचीही सवय असते. जर तुम्हीही जिऱ्याचे अधिक सेवन करत असाल, तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे.

अनेक जण भाज्यांना चव येण्यासाठी जिऱ्याचा वापर नियमितपणे करतात. अलीकडे अनेक जण वजन कमी करण्यासाठी देखील रोज सकाळी जिरे उकळून पितात. हल्ली धावपळीमुळे अनेकांची लाईफ स्टाईल बदलली आहे. अनेकांना व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतही नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी, गरम पाणी असे काही घरगुती उपयोग केले जातात. जिऱ्याचे पाणी उकळून पिण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र अधिक प्रमाणात जिऱ्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानी पोहचचू शकतं.

जर तुमच्या आहारामध्ये दररोज जिऱ्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल, तर आरोग्यावर त्याचा परिणाम देखील होऊ शकतो. दररोज तुमच्या खाण्यात मोठ्या प्रमाणात जिरे आल्यास, तुम्हाला चक्कर येणे मळमळ होने या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी जिऱ्याचे सेवन हे खूप कमी प्रमाणात असायला हवं. दररोज तुमच्या आहारात एक चमचा जिरे असतील तर हरकत नाही. मात्र जिऱ्याचं अधिक सेवन शरीरासाठी हानिकारक आहे.

जिऱ्याचा अधिक सेवनाचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर अधिक प्रमाणात होतो. महिला जिऱ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करत असतील, तर मासिक पाळी दरम्यान महिलांना याचा त्रास होतो. मासिक पाळी बरोबर मातांच्या दुधावर देखील जिऱ्याच्या अधिक सेवनाचा परिणाम होतो. असं सर्वेतून समोर आलं आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि मातांनी आहारामध्ये जिऱ्याचे सेवन खूप कमी प्रमाणात करणं आवश्यक आहे.

जर तुम्ही रक्तदाबाचे पेशंट असाल, तर तुमच्या आहारामध्ये ‘जिरे ना’च्या बराबर असायला हवे. जीऱ्याच्या अधिक सेवनाने शरीरातील रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. अधिक सेवनाने रक्तातील साखरेची पातळी देखील मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे जिऱ्याचे सेवन करताना तुम्ही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

Chanakya on money: चाणक्यांची ही गोष्ट पाळा खिसा कायम राहील गरम; अन्यथा आयुष्यभर कराल वणवण..

chargeable LED bulb: नॉर्मल बल्बच्या किमतीत घेऊन या चार्जेबल led bulb; लाईट गेली तरी रात्रभर राहतील जळत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.