Virat Kohli update: ..म्हणून विराट कोहली तिसऱ्या कसोटीतूनही बाहेर; गंभीर संकटाला तोंड देतोय विराट कोहली..

0

Virat Kohli update: सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम मैदानावर खेळवला जात आहे. पाचही कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत वर्चस्व गाजवेल, असं वाटत होते, मात्र पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने भारताच्या मनसुब्यावर पाणी फिरवले. अर्थात विराट कोहलीचा (Virat Kohli) नसल्याचा फटका भारतीय संघाला बसला.

मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. वैयक्तिक कारण देत विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघारी घेतल्यानंतर, आता तिसऱ्या कसोटीतूनही विराट बाहेर झाला आहे. विराट कोहली सध्या विदेशात असल्याची माहिती आहे. विराट कोहली कसोटी मालिकेपासून का दूर राहिला आहे, हे अधिकृतरित्या समजू शकले नसले तरी मीडिया रिपोर्टनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहलीची आई सरोज कोहली (saroj Kohli) आजारी असल्यामुळे विराट कोहलीने माघार घेतल्याचं सांगण्यात आले. मात्र विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली (vikas Kohli) याने या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं. विराट कोहली संदर्भात बीसीसीआय (BCCI) स्वतः स्पष्टीकरण देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी विराट कोहली नेहमी प्रायोरिटी देतो. आपल्या क्रिकेट करियरमध्ये विराट कोहलीने पहिल्यांदा इतकी मोठी सुट्टी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून देखील विराट कोहली अचानक मायदेशात परतला होता. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून माघार घेतली होती.

दक्षिण आफ्रिका दौरा, अफगाणिस्तान विरुद्ध झालेली टी ट्वेंटी मालिका, आणि आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील विराट कोहलीने सुट्टी घेतल्याने, विराट कोहलीवर मोठं संकट असल्याचं बोललं जात आहे. विराट कोहली विदेशात आपल्या हेल्थ संदर्भात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला अनुष्का शर्माची (anushka sharma) प्रेग्नेंसी आणि त्यानंतर विराट कोहलीची आई आजारी असल्याची माहिती देण्यात आली होती. आता मात्र विराट स्वतः वर उपचार घेत असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचाENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

Acharya Chanakya on wife: बायकोपासून या चार गोष्टी लपवल्या तरच मिळेल सन्मान आणि नातं टिकेल दीर्घकाळ..

Hardik Pandya Rohit Sharma: पांद्याचा पुन्हा छपरीपणा; रोहित शर्माला टार्गेट करत केले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.