ab de villiers apologize : विराटच्या कानउघाडणी नंतर एबी डिव्हिलियर्सने मागितली माफी; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

0

ab de villiers apologize : सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. इंग्लंड संघाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे कसोटी मालिका रंगतदार अवस्थेत आली आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यांपैकी दोन कसोटी सामने जिंकणारा संघ मालिका जिंकणार असल्याने, या मालिकेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या दोन कसोटी नंतर विराट कोहली (Virat kohli) आता आणखी दोन कसोटी सामने खेळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर इंग्लंडचं मोठं आव्हान असणार आहे.

विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यातून अधिकृतरित्या माघार घेतली होती. यासंदर्भात त्याने कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआयला (BCCI) माघार घेण्याचे कारण देखील कळवले होते. मात्र हे कारण पब्लिकली समोर आले नव्हते. विराट कोहलीने नक्की का माघार घेतली?याविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी संभ्रमता होती. अखेर ही संभ्रमता विराट कोहलीचा मित्र एबी डिव्हिलियर्सने (ab de villiers) दूर केली.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या युट्युब चॅनलच्या लाईव्ह सेशन दरम्यान विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले. खरंतर एका चाहत्याने विराट कोहलीने का माघार घेतली आहे? सगळं काही ठीक आहे का? असा प्रश्न केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अनवधानाने तो सर्व सांगून गेला. विराट सध्या दुसऱ्यांदा पिता होणार असून, तो आपल्या बाळाच्या प्रतीक्षेत असल्याचं डिव्हिलियर्स व्हिडिओत म्हटला होता. मात्र या विधानावरून आता त्याने यूटर्न घेतला असून, माफी देखील मागितली आहे.

विराट कोहलीने इंग्लंड मालिकेतून का माघार घेतली, याविषयी मी जे बोललो होतो ते चुकून बोललो. असे डिव्हिलियर्स म्हणाला आहे. विराटने का माघार घेतली, याविषयी मला काहीही माहिती नसल्याचे देखील एबी म्हणाला. एबी डिव्हिलियर्सने केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार असल्यामुळे त्याने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. असं एबी डिव्हिलियर्सने सांगितले असले तरी आता या विधानावरून त्याने युटर्न घेतला आहे. माझ्याकडून चुकीची माहिती गेल्याचं तो म्हणाला आहे. सोशल मीडियावर एबी डिव्हिलियर्सने युटर्न घेण्याचे कारण देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

विराट कोहली आणि डिव्हिलियर्स यांच्यामध्ये चर्चा झाली. विराट कोहलीने आपल्या पर्सनल गोष्टी एबी डिव्हिलियर्सला सांगितल्या. अगदी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घेण्याचे कारण देखील सांगितले. मात्र या सगळ्या गोष्टी पर्सनल होत्या. एबी चुकून लाईव्ह सेशन दरम्यान याविषयी बोलून गेला. त्यांनतर विराट कोहलीने डिव्हिलियर्सशी यासंदर्भात चर्चा केली. आणि डिव्हिलियर्सने केलेल्या विधानावरून युटर्न घेतला.

हे देखील वाचा Virat Kohli miss out: विराट कोहलीचे कमबॅक लांबणीवर; जाणून घ्या विराट कधी परतणार मैदानावर..

ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..
U19 world Cup final 2024 : भारताकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी; भारत ऑस्ट्रेलियामध्ये कोण आहे सरस..
Methi Water Benefits : फक्त दोन महिने असे प्या मेथीचे पाणी; शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.