BCCI On Virat Kohli: विराटच्या ‘फॅमिली फर्स्ट’च्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचेही दमदार उत्तर..
BCCI On Virat Kohli: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण कसोटी मालिका सुरू असली तरी सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीच्या (Virat kohli) अनुपस्थितीकडे आहेत. विराट कोहलीने सुरुवातीला पहिल्या दोन कसोटीतून माघारी घेतली होती. आता मात्र विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. मालिका सुरू झाल्यापासून, विराट कोहली न खेळण्याच्या कारणाची चर्चा अद्यापही सुरूच आहे. अशातच आता बीसीसीआयने (BCCI) देखील विराट कोहलीवर मोठं वक्तव्य केले आहे. (BCCI big statement on Virat Kohli)
विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत का खेळू शकत नाही, यावरून टीकास्त्र सुरु आहे. अनेक क्रिकेट चाहते विराट कोहलीने फॅमिली पेक्षा क्रिकेटला अधिक महत्त्व द्यायला हवं. फॅमिली पेक्षा क्रिकेट प्रथम प्राधान्य असायला हवं. असं म्हंटले होते. विराट कोहलीवर होत असलेल्या टीकेला मात्र अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टेन गन म्हणून परिचित असणारा डेल स्टेन (Dale Steyn) आणि एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) या दोघांनी क्रिकेट पेक्षा फॅमिली सर्वप्रथम असल्याचे म्हटलं आहे. डेल स्टने या संदर्भात उदाहरण देखील दिले आहे. जेव्हा मी आयपीएलमध्ये खेळत होतो, तेव्हा माझा कुत्रा आजारी होता. तेव्हा मी आयपीएल सोडून त्याच्या उपचारासाठी घरी पोहोचलो होतो. याची आठवण करून दिली.
सुरुवातीला विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून का माघार घेतली आहे, याविषयी कोणालाही माहिती नव्हतं. मात्र एबी डिव्हिलियर्सने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नकळत विराट कोहली पिता होणार असल्याचा खुलासा केला. मात्र त्यानंतर माझ्याकडून चुकीची माहिती प्रसारित झाली असल्याचा युटर्न घेतला.
मात्र तोपर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रसार माध्यमांनी आणि मीडिया हाऊसेसने विराट कोहलीच्या माघार घेण्याचे कारण प्रसारित केले होते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली. यावर एबीडीने पुन्हा एकदा फॅमिली क्रिकेट पेक्षा महत्त्वाची असल्याचे विधान केलं. तुम्हा सगळ्यांना मी ओरडून सांगतो. कृपया विराटच्या निर्णयाचा सन्मान करा. माझ्याकडून चुकीची माहिती गेल्याबद्दल मी प्रथम विराट कोहलीच्या कुटुंबाची माफीही मागतो. त्याने का माघार घेतली आहे, याविषयी मला खरचं काही माहीत नाही, असंही तो म्हणाला. आता यावर बीसीसीआयने देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी भारताने काल आपला संघ जाहीर केला. तीन कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने विराट कोहलीचाही उल्लेख केला आहे. बीसीसीआयने संघ निवडताना विराट कोहली उपलब्ध नसल्याचं सांगितले. वैयक्तिक कारणामुळे त्याने या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. आम्ही त्याच्या निर्णयाच्या पूर्णपणे पाठीशी असून, त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो. अशा प्रकारची भूमिका बीसीसीआयने घेतल्याने टीकाकारांना एकप्रकारे चपराक देखील लगावली आहे.
हे देखील वाचा Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..
Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम