Ravindra Jadeja on Father Anirudhsinh Jadeja : बायकोचा गुलाम, संपत्ती पत्नीच्या नावावर; सासरच्याने.., वडलांच्या आरोपानंतर रवींद्र जडेजाचे धक्कादायक विधान..

0

Ravindra Jadeja on Father Anirudhsinh Jadeja : कालपासून रवींद्र जडेजाच्या (ravindra jadeja) वडिलांचा इंटरव्यू (Ravindra jadeja father interview) सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा (Anirudhsinh Jadeja) यांनी आपला मुलगा जडेजा आणि सून रीवाबावर (Rivaba Jadeja) जडेजावर गंभीर आरोप केले आहेत. वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता रवींद्र जडेजाने (Ravindra jadeja) देखील पलटवार केला आहे. वडिलांवर जडेजाने केलेल्या पलटवारामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. (Ravindra Jadeja’s father allegations against daughter-in-law)

गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल फायनलनंतर (IPL final 2023) रवींद्र जडेजाच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. एकीकडे अनेक क्रिकेटर्सच्या पत्नी मॉडर्न ड्रेस परिधान करून सामना पाहायला येतात. मात्र दुसरीकडे रवींद्र जडेजाची पत्नी अजूनही आपली संस्कृती जपत असल्याचे कौतुक अनेकांकडून करण्यात आले होते.

रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग संघाला फायनल जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अखेरच्या दोन चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार खेचून चेन्नई सुपर किंग संघाला जडेजाने फायनल जिंकून दिली होती. विजयानंतर रवींद्र जडेजाची पत्नी मैदानामध्ये पोहोचली. आणि रवींद्र जडेजाच्या थेट पाया पडली होती. जडेजाच्या पाया पडताना तिने डोक्यावर पदर देखील घेतला होता l. या दृश्याचे अनेकांकडून कौतुक केले.

रवींद्र जडेजाची पत्नी सुसंस्कृत असून आपले संस्कार आणि संस्कृतीची जोपासना करत असल्याचे देखील बोलले गेले. आता मात्र रीवाबा जडेजा संदर्भात तिच्या सासर्‍याने म्हणजेच, रवींद्र जडेजाच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र जडेजावर रिवाबाने जादू केली असल्याचं रवींद्र जडेजाच्या वडील अनिरुद्धसिंह जडेजा (Anirudhsinh Jadeja) यांनी म्हंटले आहे.

गेल्या पाच वर्षापासून मी माझ्या नातीचे तोंडही पाहिलं नसल्याचं अनिरुद्धसिंह जडेजा म्हणाले आहेत. माझा आणि माझ्या मुलाचा आता काहीही संबंध राहिला नाही l. आम्ही वेगळे राहतो. तो देखील आम्हाला बोलवत नाही. आम्ही देखील त्याला बोलवत नाही. माझा मुलगा बायकोचा गुलाम झाला आहे. जडेजावर सगळे नियंत्रण त्याच्या सासरच्या लोकांचं असल्याचंही ते म्हणाले. आपली सगळी संपत्ती जडेजाने त्याच्या पत्नीच्या नावावर केली असल्याचाही आरोप त्यांनी केला.

रवींद्र जडेजावर त्याच्या वडिलांनी केलेला आरोपाला प्रतिउत्तर देताना, जडेजाने देखील सोशल मीडियावरील पोस्ट केली आहे. ज्याची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही नेटकऱ्यांनी जडेजाने आपल्या वडिलांच्या एकेकाळी केलेल्या कौतुकाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रवींद्र जडेजा आपल्या वडीलांविरोधात आणि पत्नीच्या समर्थनार्थ उतरला आहे. वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगताना तो म्हणाला, माझ्या वडिलांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये केवळ नाण्याची एक बाजू सांगितली आहे.

या घटनेची दुसरी बाजू देखील आहे. माझ्या पत्नीची प्रतिमा मली केली जात आहे. मी देखील खूप काही सांगू शकतो, मात्र जाहीरपणे सांगणं बरं नाही. असं देखील रवींद्र जडेजा म्हणाला आहे. रवींद्र जडेजाच्या विधानावरून वडील अनिरुद्धसिंह जडेजा आणि त्याच्यामध्ये कोणतेही नाते राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र त्याने वडीलां विषयी अधिक बोललं टाळलं आहे.

हे देखील वाचा  Jadeja’s father allegations: घरी सासऱ्याचा छळ, कॅमेऱ्यापुढे मात्र डोक्यावर पदर; पाच वर्षापासून पोराचं तोंडही पाहू दिलं नाही..

IND vs AUS U19 World Cup final: ..तरच भारत जिंकण्याची आशा अन्यथा 2023 विश्वचषकाची पुनरावृत्ती निश्चित; हे आहे उद्याच्या सामन्याचे गणित..

Mauris Noronha: अभिषेक घोसाळकर हत्त्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मारेकरी दुसराच, मॉरिसला त्यानेच संपवलं..

Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..

Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.