IND vs AUS U19 World Cup final: ..तरच भारत जिंकण्याची आशा अन्यथा 2023 विश्वचषकाची पुनरावृत्ती निश्चित; हे आहे उद्याच्या सामन्याचे गणित..

0

IND vs AUS U19 World Cup final: अंडर नाईन्टीन विश्वचषकावर (U19 World Cup) भारतीय युवा खेळाडूंचा कायम दबदबा राहिला आहे. 19 वर्षाखालील भारतीय संघ आत्तापर्यंत नऊ वेळा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. नऊ पैकी पाच वेळा भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यामध्ये यश आले आहे. तर तीन वेळा भारतीय संघ फायनलमध्ये पराभूत देखील झाला आहे. उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 19 वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. लगातार 10 सामने जिंकून भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आम्हीच आयसीसी स्पर्धेचे किंग आहोत, हे दाखवून दिले. आता या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय युवा खेळाडूंच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे.

2023 मध्ये झालेल्या विश्वचषक प्रमाणे 19 वर्षाखालील विश्वचषकात देखील भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. जवळपास सगळे सामने भारतीय संघाने एकहाती जिंकले आहेत. सेमी फायनल सामन्यात मात्र भारतीय संघाला विजय खेचून आणण्यामध्ये संघर्ष करावा लागला होता. मात्र खराब सुरुवातीनंतरही भारतीय संघ पॅनिक झाला नाही. अखेर पर्यंत कडवी झुंज देत विजय खेचून आणला.

फायनल पूर्वी झालेल्या सेमी फायनल सामन्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित झाला आहे. 4 बाद 32 अशा बिकट परिस्थितीतून देखील भारतीय युवा खेळाडूंनी विजय खेचून आणला. साहजिकच यामुळे कुठल्याही परिस्थितीतून आपण सामना जिंकू शकतो, हा आत्मविश्वास खेळाडूंमध्ये आला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ आणि त्यांची गोलंदाजी पाहता भारताला अंतिम सामना जिंकण तितकसं सोप्पं नसणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना हा सामना स्टार स्पोर्ट आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. महत्त्वाच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अनेकदा घेतला जातो. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये धावांचा पाठलाग करणं, अधिक सोयीस्कर राहिलं आहे.

जर भारतीय संघाची प्रथम फलंदाजी आली, तर सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला अडीचशे धावांपर्यंत मजरावीच लागणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पाहता हे आव्हान तितकं सोपं नाही. भारतीय सलामीवीर या टूर्नामेंटमध्ये अपयशी ठरले आहेत. कॅप्टन उदय सहारन (uday Saharan) सचिन धस (sachin dhas) मुशीर खान (mushir Khan) या तील फलंदाजांवर भारतीय फलंदाजीची मदार असणार आहे.

भारतीय संघाची जर दुसऱ्यांदा बॅटिंग आली, तर मात्र भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाला 230 धावांपर्यंत रोखणे आवश्यक असणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने जर अडीचशे धावांपर्यंत मजल मारली, तर भारतीय संघाला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकणे मोठं आव्हान निर्माण होऊ शकते. उद्याच्या सामन्यात जलदगती गोलंदाज राज लिंबाणी (raj limbani) फलंदाज उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस यांच्यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

हे देखील वाचा India squad announced for last 3 test : उर्वरित तीन कसोटीसाठी आश्चर्यकारक संघाची घोषणा; श्रेयस बाहेर, विराटवरही BCCI चे मोठे विधान..

Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..

Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..

ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर; मॉरिसने गोळ्या घालून स्वतःलाच का संपवले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.