IPL 2024 announcement : यंदा आयपीएल दोन टप्प्यात; 22 मार्च पासून रणसंग्रामाला सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण स्वरूप..

0

IPL 2024 announcement : क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलचे (ipl) वेध लागले असून 22 मार्चपासून (22 March) आयपीएलला सुरुवात होणार आहे. यावर्षी लोकसभा निवडणुका आणि आयपीएल एकाच वेळी असल्याने, क्रिकेट चाहत्यांना यंदा आयपीएल दोन टप्प्यात पाहावी लागणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी याविषयी स्पष्टता दिली आहे.

आयपीएल स्पर्धा केवळ भारतातच नाही, तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक देखील असतात. भारतामध्ये आयपीएलला कोणत्याही उत्सवापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आयपीएलमुळे अनेक खेळाडू देखील निर्माण झालेत. आपापल्या आवडत्या खेळाडूंना चिअर्स करण्यासाठी चाहते देखील मोठ्या संख्येने मैदानात पोहचतात.

आता आयपीएल 2024 संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 15 दिवसाची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. 15 दिवसाच्या स्पर्धेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. मात्र 22 मार्च ही आयपीएल सुरू होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

2009 साली देखील आयपीएल आणि लोकसभा निवडणुका एकच वेळी आल्या होत्या. तेव्हा मात्र आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आली होती. यावेळी जरी लोकसभा निवडणुका होणार असल्या तरी आयपीएल मात्र विदेशात हलवण्यात येणार नाही. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, उर्वरित वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहेत.

मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार पदावरून हकालपट्टी केल्यामुळे, आयपीएल स्पर्धा आणखीन चर्चेत आली. हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya) नेतृत्त्वात रोहित शर्मा खेळणार का? याची देखील उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. रोहित शर्मा ट्रेडच्या माध्यमातून दिल्ली संघात जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे. या सगळ्या संभ्रमतेमुळे आयपीएलला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

 हे देखील वाचा IND vs ENG 4th test India squad : चौथ्या कासोटीतून दोन मॅचविनर खेळाडू आउट; संघाची घोषणा, रोहित पुढे मोठे आव्हान..

Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराटने इतक्या दिवस मुलाचा जन्म का लपवला? जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ आणि विराटने लोकांना केलेलं आवाहन..

IPL 2024 : कोच माईक हेसनचा RCB ला घरचा आहेर; थेट वर्मावर बोट ठेवत म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.