Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराटने इतक्या दिवस मुलाचा जन्म का लपवला? जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ आणि विराटने लोकांना केलेलं आवाहन..

0

Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराट कोहली (Virat kohli) भारतीय क्रिकेट पासून का दूर आहे, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही आठवड्यापासून पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, विराटने स्वतः याविषयी खुलासा केला आहे. विराट दुसऱ्यांदा पिता झाला असून, त्याने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या संदर्भात विराट कोहलीने स्वतः माहिती देत आपल्या मुलाचं नाव देखील जाहीर केलं. विराटने मुलगा झाल्याचे जाहीर केल्यानंतर, त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. (Virat kohli became a father for the second time)

विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारण ते पहिल्या दोन कसोटीने माघार घेतली होती. दोन कसोटी सामन्यानंतरही त्याचे पुनरागमन होऊ शकले नाही. आणि इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या संपूर्ण कसोटी मालिकेतून विराट आउट झाला. साहजिकच त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण देखील निर्माण झालं. विराट नक्की कोणत्या समस्येतून जात आहे, असे काही प्रश्न चाहत्यांना पडले. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एबी डिव्हिलियर्सने विराट कोहली क्रिकेट पासून का दूर आहे, हेही सांगून टाकलं होतं.

विराट कोहली कडून आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माविषयी प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. मात्र एबी डिव्हिलियर्स कडून चुकून यासंदर्भात खुलासा झाला. विराट कोहली पिता होणार असल्याने, क्रिकेट पासून ब्रेक घेतला असल्याचं एबी डिव्हिलियर्स म्हणाला. विराट कोहलीने पाळलेली गोपीनीयता भंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर, एबी डिव्हिलियर्स सांगितलेली बातमी खरी असल्याचंही स्पष्ट झाले. मात्र आपल्याकडून चूक झाली हे लक्षात आल्यानंतर, एबी डिव्हिलियर्सने यु टर्न घेतला. माझ्याकडून चुकीची बातमी प्रसारित झाल्याचं तो म्हणाला.

आता मात्र एबी डिव्हिलियर्सने दिलेली माहिती खरी असल्याचे देखील सिद्ध झालं आहे. काल विराट कोहली ने स्वतः आपल्या इंस्टाग्राम वरून पोस्ट करत मला, अनुष्का शर्माला (anushka sharma) मुलगा झाला आणि वामीकाला छोटा भाऊ झाला असल्याचं विराट कोहली म्हणाला.

यासोबतच विराट कोहलीने आपल्या मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे. अकाय (akaay) असं विराट कोहलीच्या मुलाचे नाव आहे. (Virat Kohli son name is akaay) विराट कोहलीने ठेवलेल्या अकाय या नावाचा अर्थ काय आहे? याविषयी देखील चाहते मोठ्या प्रमाणात सर्च करू लागले. जाणून घेऊया विराट कोहलीने आपल्या मुलाच्या ठेवलेल्या अकाय या नावाचा अर्थ.

अकाय हा मूळ संस्कृत शब्द आहे. अनेकजण आपल्या मुलाचे नाव ठेवताना नावाचा अर्थ काय आहे, हे देखील लक्षात घेतात. इतकच नाही, तर नाव ठेवण्यासाठी अनेक विचारवंत आणि त्या त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना विचारून नाव ठेवले जाते. अनेक जण आपल्या मुलाची नाव ठेवून अनेकांना आश्चर्यचकित करतात. विराट कोहलीने देखील आपल्या मुलाचं नाव ठेवताना असेच काहीसं केले आहे. अकाय हा मूळ संस्कृत शब्द आहे. अकाय या शब्दाचा अर्थ आहे, शरीरहीन.

ज्याला शरीर नाही, जो शरीरविरहित आहे, अशांना ‘अकाय’ म्हंटले जाते. विराट कोहलीने आपल्या मुलाचा जन्म आणि नाव जाहीर करताना लोकांना आवाहन देखील केले तुम्ही सर्वजण आमच्या गोपनीयतेचा सन्मान कराल अशी अपेक्षा करून, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. असेही विराट कोहली म्हणाला. विराटने 15 फेब्रुवारी आपल्या मुलाला जन्म दिला. मात्र 20 फेब्रुवारीला त्याने या आनंदी प्रवासाची घोषणा केली. साहजिकच अनेकांना प्रश्न पडला पाच दिवस विराट कोहलीने गोड बातमी द्यायला उशीर का केला? साहजिकच बाळ आणि आईच्या मेडिकल फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने ही सुंदर बातमी दिली आहे.

हे देखील वाचा Virat Kohli baby boy : ज्युनियर कोहलीचे आगमन! नावही ठेवलं भन्नाट; या दिवशी दिला बाळाला जन्म..

Rohit Sharma on youngsters : यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ध्रुव जुरेलचा फोटो पोस्ट करत रोहितने दिला थेट इशारा; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.