Virat Kohli baby boy : ज्युनियर कोहलीचे आगमन! नावही ठेवलं भन्नाट; या दिवशी दिला बाळाला जन्म..

0

Virat Kohli baby boy : ज्युनियर कोहलीचे आगमन! नावही ठेवलं भन्नाट; या दिवशी दिला बाळाला जन्म..Virat Kohli baby boy गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर (social media) ट्रेंडिंगवर आहे. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतल्यानंतर, विराट कोहली चर्चेचा विषय बनला होता. आपल्या सोळा वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीत विराट कोहलीने पहिल्यांदाच संपूर्ण मालिकेतून ब्रेक घेतल्याने अनेकांना धक्का बसला. विराट कोहली नक्की का ब्रेक घेत आहे, याविषयीच्या चाहत्यामध्ये प्रचंड संभ्रमता पाहायला मिळत होती. अखेर या संभ्रमतेवर पडदा पडला असून, विराट कोहली स्वतः याविषयी पोस्ट करत खुलासा केला आहे. (Virat Kohli and Anushka Sharma baby boy comes)

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहलीने वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती. नंतर मात्र विराट कोहली पाचही कसोटी सामन्यातून बाहेर झाला आणि अनेकांना धक्का बसला. विराट कोहली नक्की का माघार घेत आहे? विराट कोहलीचा परिवार ठीक आहे का? याविषयी देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. विराट कोहलीची आई आजार असल्याच्या बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या होत्या. मात्र विराटच्या मोठ्या भावाने हे वृत्त फेटाळून लावले.

साहजिकच त्यामुळे चाहत्यांमध्ये आणखीन संभ्रमता वाढली. अखेर सगळ्या संभ्रमतेवर विराट कोहलीने पडदा टाकला असून, आपण का ब्रेक घेतला, हेही त्याने स्पष्ट केले आहे. विराट कोहलीने (Virat kohli) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आपण दुसऱ्यांदा पिता झाल्याची गोड बातमी दिली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करून विराट कोहली म्हणाला, अनुष्काने (Anushka Sharma) आणि मी पंधरा फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव ‘अकाय’ (akaay) असं ठेवलं असल्याचं देखील विराट कोहली म्हणाला.

विराट पुढे म्हणाला, वामिकाला छोटा भाऊ झाला आहे. आम्ही प्रचंड आनंदी आहोत. यावेळेस तुम्ही प्रायव्हसी ठेवली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार. जूनियर विराट कोहलीचे आता या जगात आगमन झाल्याने, विराट कोहलीचे चाहते देखील प्रचंड आनंदीत आहेत.

अवघ्या काही मिनिटात विराट कोहलीने केलेल्या पोस्टला तब्बल वीस लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी विराट आणि अनुष्काला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, मृणाल ठाकूर, युझवेंद्र चहल यांचाही समावेश आहे.

विराट कोहलीचा मित्र एबी डिव्हिलियर्सने यासंदर्भात माहिती देखील दिली होती. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला होता, विराट कोहलीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने त्याने क्रिकेटपासून ब्रेक घेतला आहे. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एबी डिव्हिलियर्स न कळत बोलून गेला. नंतर मात्र एबी डिव्हिएसने दिलेल्या माहितीत काहीतरी तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. मात्र तेव्हापासून विराट कोहलीने नक्की का ब्रेक घेतला, याविषयी अंदाज बांधले जात होते. आता या सगळ्यावर अखेर पडदा पडला असून, विराट आणि त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद आहे.

हे देखील वाचा IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

IPL 2024 : कोच माईक हेसनचा RCB ला घरचा आहेर; थेट वर्मावर बोट ठेवत म्हणाले..

Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकणार विवाहबंधनात? त्या ट्विटमुळे झाला खुलासा..

Rohit Sharma on youngsters : यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ध्रुव जुरेलचा फोटो पोस्ट करत रोहितने दिला थेट इशारा; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.