Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकणार विवाहबंधनात? त्या ट्विटमुळे झाला खुलासा..

0

Sania Mirza Mohammed Shami : भारताची टेनिस स्टार्स सानिया मिर्झा (sania Mirza) सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) सोबत सानिया मिर्झाचा विवाह 2010 मध्ये झाला होता. बारा वर्षाचा सुखी संसार केल्यानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांना आपल्या लग्नापासून एका अपत्य देखील आहे. सध्या त्याचा संगोपन सानिया मिर्झा करत आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेला एक दीड वर्षापासून सातत्याने समोर येत होत्या. मात्र दोघांकडून याबाबत खुलासा करण्यात आला नव्हता. शेवटी आता शोएब मलिकने (Shoaib Malik married) लग्न केल्यानंतर दोघाचाही घटस्फोट झाल्याचं समोर आलं.

सानिया मिर्झा घटस्फोटामुळे चर्चेत आली असून, सध्या ती आपले आयुष्य एकटीच जगत आहे. काही दिवसापूर्वी आपला एक्स पार्टनर रोहन बोपण्णा (rohan bopanna) सोबत सानिया मिर्झा रोमँटिक मूडमध्ये पोझ देताना पाहायला मिळाली होती. रोहन बोपण्णा (Rohan bopanna) ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर सक्सेस पार्टी ठेवली होती. या पार्टीमधील सानियाचा लुक चर्चेचा विषय बनला होता. या चर्चा ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा सानिया मिर्झा लग्न करणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत.

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा हे लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. केवळ चर्चाच नाही, तर दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) देखील घटस्फोट झाला आहे. त्याला देखील एक मुलगी असून, तोही सध्या एकटाच राहत आहे. साहजिकच दोघेही सिंगल असल्याने, लग्न करणार असल्याचं बोललं गेलं. मात्र आता या केवळ अफवा होत्या हे स्पष्ट झाले आहे.

इतकच नाही, तर सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी या दोघांनी लग्न केलं असल्याचं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये कमालची संभ्रमता पसरली. मात्र सोशल मीडियावर दोघांचे एकत्रित पोस्ट केलेले फोटो हे AI बेस्ड असल्याचं समोर आले.

आणखी काही ट्विटर हँडल वरून मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र दोघांच्या लग्नाच्या केवळ अफवा पसवल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेले जवळपास सगळेच फोटो हे AI बेस्ड असल्याचं समोर आले आहे. भारतामध्ये अनेक स्टार लोकांसंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरले जातात. मोहम्मद शमी सानिया मिर्झा सोबत देखील हाच प्रकार घडला आहे. मात्र दोघेही लग्न करणार असल्याच्या बातमीत काहीही तथ्य नाही.

हे देखील वाचा Rohit Sharma on youngsters : यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ध्रुव जुरेलचा फोटो पोस्ट करत रोहितने दिला थेट इशारा; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.