Rohit Sharma on youngsters : यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ध्रुव जुरेलचा फोटो पोस्ट करत रोहितने दिला थेट इशारा; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

0

Rohit Sharma on youngsters : तिसरा कसोटी सामना भारत आणि दिमाखात जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना भारताने तब्बल 434 धावांनी जिंकला. तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि ध्रुव जुरेल (Dhruv jurel) या दोघांनीही चमकदार कामगिरी केली. नवख्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) देखील या मालिकेतील दुसरे द्विशतक झळकावले. आता या तिघांच्या कौतुकाची हटके पोस्ट करत रोहित शर्माने (Rohit Sharma) अनेकांना टार्गेट केले.

रोहित शर्मा मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी खेळाडूंना शिवीगाळ करतानाही पाहायला मिळतो. तर कधी खेळाडूंची नक्कल करताना देखील अनेकदा रोहित शर्माला पाहण्यात आलं आहे. मैदानावर खेळाडूंना शिवीगाळ केल्यानंतर, रोहित शर्मा खेळाडूंना हे

मैदानापुरतच होतं. राग मानण्याचं काहीही कारण नाही. असं म्हणताना देखील पाहायला मिळतो.

रोहित शर्मा हा खेळ नवीन खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देतो, असं अनेकांकडून सांगितलं जातं. सरफराज खानचे पदार्पण झाल्यानंतर, रोहित शर्माने सर्फराज खानच्या आई वडिलांची देखील भेट घेतली होती. याचे देखील कौतुक मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. सरफराज खानने पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली.

ध्रुव जुरेलने देखील पहिल्या डावात 46 धावांची खेळी केली. फलंदाजी व्यतिरिक्त ध्रुव जुरेलने विकेट कीपिंग देखील उत्कृष्ट केली. या तीन खेळाडूंचे कौतुक करताना, रोहित शर्माने एक इन्स्टा स्टोरी ठेवली. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित शर्माने यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान सेलिब्रेशन करताना आणि ध्रुव जुरेलने बेन डकेटला रनआउट केल्याचा क्षण असे तीन फोटो रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवले. (Rohit sharma instagram story viral)

तिघांचे फोटो आपल्या इस्टाग्राम स्टोरीला ठेवत रोहित शर्माने ‘आज कल के बच्चे’ असे भन्नाट कॅप्शनही ठेवले. रोहित शर्मा ठेवलेले कॅप्शन हे अनेकांना टार्गेट करणारं होतं, असं देखील आता बोललं जात आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने खेळण्याचा फायदा होतो. असं रोहित शर्माला सुचवायचं असल्याचे बोलले जात आहे. ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान या तिघांनीही देशांतर्गत क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळले आहे.

ईशान किशनलाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने कोच राहूल द्रविडच्या (rahul Dravid) या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. साहजिक त्यामुळे रोहित शर्माने ईशान किशनला टार्गेट करण्यासाठीच तिघांचे कौतुक करत इंस्टा स्टोरी ठेवली. असा देखील तर्क आता लावला जात आहे.

हे देखील वाचा IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

Jay Shah on Ishan Kishan: पत्र लिहून ईशान किशनला खडसावत जय शाहने दिली शेवटची वॉर्निंग; म्हणाले..

Haldi Ceremony : म्हणून लग्नापूर्वी वधू-वराला लावतात हळद; लग्न करण्यापूर्वी हळदीचे हे रहस्य माहिती असायलाच हवं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.