Jay Shah on Ishan Kishan: पत्र लिहून ईशान किशनला खडसावत जय शाहने दिली शेवटची वॉर्निंग; म्हणाले..

0

Jay Shah on Ishan Kishan: ईशान किशन (ishan Kishan) गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट मधून गायब आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली टी ट्वेंटी सिरीज ईशान किशनची शेवटची मालिका होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ईशान किशनची निवड करण्यात आली होती. मात्र ईशान किशनने मानसिक थकव्याचे कारण देत माघार घेतली होती. मानसिक थकव्याचे खोटे कारण ते ईशान किशन दुबईमध्ये पार्टी करताना पाहण्यात आला. तेव्हापासून ईशान किशन भारतीय क्रिकेटपासून दूर असून, त्याच्यावर बीसीसीआयने (BCCI) शिस्तभंगाची कारवाई केल्याचे बोलला जात आहे.

सध्या भारत आणि इंग्लंड (ind vs ENG test series) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने दिमागदार पद्धतीने जिंकला आहे. या विजयाबारोबर मालिकेत 2-1 अशी आघाडीही घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्ध 3 t20 सामन्याची मालिका खेळली. या मालिकेत देखील ईशानकडे दुर्लक्ष करण्यात आले.

इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ज्यामधून ईशान किशनला वगळण्यात आले. ईशान ऐवजी केएस भरतला( ks Bharat) संधी देण्यात आली. दोन्ही कसोटी सामने पार पडल्यानंतर, उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी ईशान किशनचे भारतीय संघात पुनरागमन होईल, असं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

ईशानकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने, ईशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई केली गेली, हे स्पष्टही झालं. भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड (rahul Dravid) यांनी ईशान किशनला डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला होता. मात्र ईशान किशनने त्याकडे दुर्लक्ष केले. ज्यामुळे बीसीसीआय आणि ईशान किशन या दोघांमधील मतभेद वाढत गेले.

डोमेस्टिक क्रिकेट न खेळता ईशान किशन आयपीएलची तयारी करताना पाहायला मिळाला होता. यावर आता बीसीसीआयचे सचिव जय शहा (jay shah) यांनीही नवीन खेळाडूंना पत्र लिहिले आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याने जय शहा यांनी सर्वच खेळाडूंना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे, देशांतर्गत क्रिकेट हे आमच्यासाठी प्रचंड महत्त्वाचे आहे.

जय शहा पुढे म्हणाले, देशांतर्गत क्रिकेट आमच्यासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. देशांतर्गत क्रिकेटकडे नवीन खेळाडूना दुर्लक्ष करून चालणार नाही. जर असं करून आयपीएला प्राधान्य देत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो, आयपीएलच्या कामगिरीवर आम्ही निवड करणार नाही. देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या परफॉर्मन्सवरच खेळाडूंची निवड भारतीय संघात केली जाणार आहे. जर देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करून खेळाडू आयपीएलवर फोकस करीत असतील, तर त्यांच्यासाठी हे चांगलं होणार नसल्याचा गर्भित इशारा जय शहा यांनी एक प्रकारे ईशान किशनला दिला आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

Virat Kohli T20 World Cup : विराट कोहली सोबत षडयंत्र? रोहित T20 संघात; मग विराट कोहली का नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.