Virat Kohli T20 World Cup : विराट कोहली सोबत षडयंत्र? रोहित T20 संघात; मग विराट कोहली का नाही..

0

Virat Kohli T20 World Cup : सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याचे मालिका सुरू आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन केलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही बीसीसीआय सचिव जय शहा (jay shah) यांनी विराट कोहली (Virat Kohli) विषयी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाच्या खेळात आज सरफराज खानने (sarfraaz khan) केलेल्या फलंदाजीचे जोरदार कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत सर्वोत्कृष्ट स्पिन गोलंदाजी खेळणारा खेळाडू म्हणूनही सरफराज खानचे कौतुक होत आहे. ध्रुव जुरेल (Dhruv jurel) आणि सरफराज खान (sarfaraaz khan) या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये आज पदार्पण केले आहे. अनिल कुंबळे (Anil kumble) यांच्याकडून पदार्पण कॅप देताना सर्फराज खानच्या (Sarfaraz Khan test Debut) वडिलांना आश्रू अनावर झाले. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद देखील झाल्याचीही चर्चा सुरू आहे.

एकीकडे इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अजूनही विराट कोहली (Virat Kohli) t20 विश्वचषकात खेळणार की नाही, याचीही चर्चा सुरू आहे. (Virat Kohli T20 World Cup 2024) काल बीसीसीआय (BCCI) सेक्रेटरी जय शहा (BCCI secretary jay Shah) यांनी रोहित शर्मा (rohit sharma) हाच आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले. अर्थात रोहित शर्मा टी-20 विश्वचषक खेळणार असल्याने विराट कोहली खेळणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जय शहा यांनी थेटपणे नकार दिला नसला तरी त्यांच्या उत्तरात विराट कोहली टी ट्वेंटी विश्वचषक खेळणार नाही, हेच जाणवत होते. असे बोलले जाऊ लागले आहे. विराट कोहली विषयी बोलताना जय शहा म्हणाले, विराट टी ट्वेंटी विश्वचषक खेळणार की नाही, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. आयपीएलचा परफॉर्मन्स विराट कोहली संघात संधी मिळणार की नाही, ही हे ठरवणार आहे. जर असं असेल, तर विराट कोहलीचा हा अपमान असल्याचं बोललं गेलं आहे.

जर रोहित शर्माला भारताच्या टी ट्वेंटी संघात संधी मिळत असेल, तर विराटला संधी मिळणार की नाही, याविषयी बीसीसीआय स्पष्ट का बोलू शकत नाही? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. विराट कोहलीला वगळण्यात येणार असून, त्या संदर्भात हे सगळं षडयंत्र रचले जात आहे. असे देखील आता सोशल मीडियावर बोलले जात आहे. अनेक टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये कोहलीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. तरीही त्याला संधी देण्यात येणार की नाही, याविषयी बीसीसीआय विचार करत असेल, तर हा त्याचा खूप मोठा अपमान असल्याचं बोलले जात आहे.

हे देखील वाचा Jay Shah on Virat Kohli: T20 world Cup मध्ये रोहित कर्णधार, मग विराटला संधी का नाही? जय शहा म्हणाले..

Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

Chanakya Niti for husband-wife relationship: या तीन गोष्टी संपवतात पती-पत्नीचं हसतं खेळतं आयुष्य..

Hardik Pandya Jay Shah: हार्दिक पांड्याच्या या खेळीने रोहित शर्माच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या हार्दिकची रणनीती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.