Chanakya Niti for husband-wife relationship: या तीन गोष्टी संपवतात पती-पत्नीचं हसतं खेळतं आयुष्य..

0

Chanakya Niti for husband-wife relationship: आचार्य चाणक्य (acharya Chanakya) थोर विद्वान होते. आचार्य चाणक्य यांच्या कुशलता, रणनीती, आणि अर्थकारणाविषयी अधिकतेने सांगण्याची आवश्यकता नाही. आजही चाणक्यांनी सांगितलेल्या चाणक्य नीती (Chanakya niti) मूल्यांचा वापर करून आयुष्य जगणाऱ्यांची संख्या पुष्कळ प्रमाणात आहे. नातेसंबंधावर देखील आचार्य चाणक्य यांनी सविस्तर लिहून ठेवलं आहे. सुखी वैवाहिक जीवनाविषयी आचार्य चाणक्याचे मत खूप मौल्यवान आहे.

अलीकडच्या काळात वैवाहिक जीवनामध्ये असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळते. अलीकडे लग्नाच्या काही महिन्यानंतर, पती-पत्नी दोघांमध्ये प्रचंड वादविवाद व्हायला सुरुवात होते. आचार्य चाणक्यांनी याविषयी देखील सविस्तरपणे भाष्य केलं असून, वैवाहिक जीवन सुखी पद्धतीने जगण्याचा मूलमंत्रही दिला आहे. जाऊन घेऊया, या विषयी सविस्तर..

पती-पत्नीचे नाते प्रेम, विश्वास, एकमेकांप्रती आदर या गोष्टींवर अधिक टिकून असते. चाणक्य सांगतात, जर या गोष्टींचा ताळमेळ साधायचा असेल, तर तुमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुसंवाद असायला हवा. कोणत्याही नात्यांमध्ये चढउतार हे येत असतात. अनेकदा वादविवाद, भांडणे देखील होतात. मात्र या सगळ्या गोष्टींमधून जर बाहेर निघायचं असेल, तर तुम्ही अधिक संवाद साधायला हवा. संवादाशिवाय कोणतही नातं जास्त काळ टिकू शकत नाही, असं चाणक्य सांगतात.

चाणक्याने सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास आणि सन्मान. आचार्य चाणक्य सांगतात, कोणत्याही नात्यांमध्ये विश्वास आणि दोघांकडून एकमेकांना मिळत असणारा सन्मान या गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात. नात्यामध्ये प्रेम अधिक नसेल, तरी देखील नातं टिकू शकते. मात्र दोघेही एकमेकांचा सन्मान करत नसतील, तर नातं कधी कोलमडून पडेल, हे सांगता येत नाही. पती-पत्नीला वैवाहिक जीवनात सुखी आणि आनंदी जगायचं असेल तर दोघांना एकमेकांविषयी विश्वास आणि सन्मान प्रस्थापित करावा लागेल.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दिखावा हा खूप मोठा शत्रू असल्याचं चाणक्य सांगतात. चाणक्य सांगतात पती-पत्नी दोघांमध्ये निखळ प्रेम असणं फार आवश्यक आहे. पती-पत्नीच्या नात्यात कधीही खोटे बोलू नका. दोघेही एकमेकांप्रती नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. नकळत एखाद्या वेळेस पत्नी किंवा पतीची फसवणूक झाली असेल, तर याविषयी देखील तुम्ही आपल्या जोडीदाराशी संवाद साधा. विश्वास हा दोरी प्रमाणे असतो. एकदा दोरी तुटली की ती पुन्हा जोडली जात नाही. जोडायची झालीच तर मध्ये गाठ पडते. तसेच विश्वासाचे देखील असतं, असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा  Jay Shah on Virat Kohli: T20 world Cup मध्ये रोहित कर्णधार, मग विराटला संधी का नाही? जय शहा म्हणाले..

Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.