Jay Shah on Virat Kohli: T20 world Cup मध्ये रोहित कर्णधार, मग विराटला संधी का नाही? जय शहा म्हणाले..

0

Jay Shah on Virat Kohli: काल बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा (Jay Shah announced Rohit sharma as T20 World Cup captain) भारतीय संघाचा कर्णधार असेल, असं जाहीररित्या सांगितलं आहे. 2023 मध्ये झालेला World Cup जिंकण्यात भारतीय संघाला अपयश आले असले तरी भारतीय संघाने अनेकांची मने जिंकल्याचं जय शाह (jay shah) म्हणाले. रोहित शर्माचे कौतुक करताना टी-ट्वेंटी विश्वचषकामध्येही तो कर्णधार असेल, असंही म्हणाले.

जय शहा (jay shah) यांनी आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (rohit sharma) करणार असल्याचं म्हटलं असलं तरी विराट कोहली (Virat kohli) विषयी मात्र धक्कादायक विधान केलं आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार असेल ही घोषणा केल्यानंतर, पत्रकाराने विराट कोहली विषयी प्रश्न विचारला. आगामी t20 विश्वचषक संघात विराट कोहली असेल का? असा प्रश्न पत्रकाराकडून विचारण्यात आला.

पत्रकाराकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जय शहा म्हणाले, विराट कोहली t20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विराटला संधी द्यायची की नाही, हे संघ निवडी वेळी ठरवण्यात येईल. एक प्रकारे विराट कोहलीला t20 वर्ल्डकप मधून डावलले असल्याचे देखील आता बोलले जाऊ लागले आहे.

T20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून देखील विराटला संधी द्यायची की नाही, यावर विचार सुरू असेल तर हा विराट कोहलीचा अपमान आहे. असं आता बोललं जाऊ लागलं आहे. इतकंच नाही तर, जय शहा यांनी विराट कोहलीचा एक प्रकारे अपमान केला असल्याचं देखील आता बोललं जाऊ लागलं आहे. गेल्या तीन टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये रोहित शर्मा फलंदाज म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

तरीदेखील त्याला संघात संधी मिळू शकते. मात्र विराट कोहलीने अनेक t20 विश्वचषकामध्ये मालिकावीर पुरस्कार पटकावला आहे. असं असूनही त्याला डावलले जात असेल तर हा त्याच्यावर होणार मोठा अन्याय असल्याचं बोललं जात आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकप संदर्भात जर विराट कोहली विषयी निर्णय अद्याप झाला नसेल, तर त्याने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीला न्याय न देण्यासारखं असल्याचं बोललं जात आहे.

बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह यांच्या विधानामुळे विराट कोहली टी ट्वेंटी विश्वचषक खेळणार की नाही, याविषयी मोठी संभ्रमता निर्माण झाली आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये आता मोठी नाराजी पसरली आहे. विराट कोहली सध्या वैयक्तिक कारणामुळे क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट आयपीएलमध्ये परतणार आहे. मात्र आयपीएलमध्ये सुरुवातीचे काही सामने देखील तो खेळू शकणार नसल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

Hardik Pandya Jay Shah: हार्दिक पांड्याच्या या खेळीने रोहित शर्माच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या हार्दिकची रणनीती..

IND vs ENG Rajkot test: सरफराज खान खेळणार का? जाणून घ्या राजकोट कसोटीसाठीची भारतीय प्लेइंग11..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.