IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

0

IND vs ENG 4th test : तिसऱ्या कसोटी सामन्यात काल भारतीय संघाने इंग्लंडवर दमदार विजय संपादन केला. या विजयाबरोबर मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने केवळ तिसरा कसोटी सामना जिंकलाच नाही, तर इंग्लंड संघाच्या बॅझबॉलची (bazball) हवा देखील काढली. भारतीय फिरकीपट्टू पुढे इंग्लंड फलंदाजाचा बेझबॉल चालला नाही. मात्र भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या स्टाईलमध्ये फलंदाजी केली. आता चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या निश्चयाने मैदानात उतरणार आहे.

23 फेब्रुवारीला चौथा कसोटी सामना रांचीच्या (ind vs ENG Ranchi test) मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दुखापतीमुळे दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळू न शकणाऱ्या केएल राहुलचे (kl Rahul) पुनरागमन होणार आहे. केएल राहुल संघात परतणार असल्याने, प्लेइंग इलेव्हनचं मोठं आव्हान टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्मापुढे (rohit sharma) असणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदार (rajat Patidar) अपयशी ठरला आहे. त्यामुळे रजत पाटीदारच्या जागेवर केएल राहुल (kl Rahul) भारतीय संघात खेळताना दिसेल, असं बोललं जात होतं. मात्र रजत पाटीदारला आणखी एक संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. केएल राहुलला भारतीय संघात संधी देण्यासाठी सरफराज खानचा (Sarfaraz Khan) बळी दिला जाणार असल्याचीही माहिती आहे. यासंदर्भातले वृत्त देखील अनेक माध्यमांनी दिले आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पडणाऱ्या सरफराज खानला भारतीय संघात खूप उशिरा संधी मिळाली. जरी त्याला संधी मिळाली असली तरी यासाठी त्याला खूप प्रतीक्षा देखील करावी लागली. दमदार कामगिरी करून देखील सातत्याने निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने देखील केले. आता मात्र चौथ्या कसोटी सामन्यात त्याला बाकावर बसावं लागण्याची शक्यता आहे.

निवड समिती नंतर जर टीम मॅनेजमेंटने देखील सरफराज खानकडे दुर्लक्ष केलं तर भारतीय क्रिकेटसाठी हे खूप मोठे नुकसान आहे. अनेक क्रिकेट दिग्गजांकडून सरफराज खानच कौतुक करण्यात आलं आहे. सरफराज खान आपला पहिलाच कसोटी सामना खेळत आहे, असं कधीच वाटलं नाही. तो प्रचंड कॉन्फिडन्स आणि तंत्रशुद्ध पद्धतीने आपल्या पदार्पणाचा सामना खेळत होता.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करण्याचा हा परिणाम होता. असं अनेकांकडून म्हटलं गेलं. मात्र जर टीम मॅनेजमेंट कडूनही सरफराज खानकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचा आत्मविश्वास देखील कोलमडला जाण्याची शक्यता आहे. सरफराज खानने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आहेत. पहिल्या डावात सरफराज खानकडे मोठी खेळण्याची संधी होती, मात्र दुर्दैवाने रवींद्र जडेजाला चुकीमुळे तो धावबाद झाला.

हे देखील वाचा  Jay Shah on Ishan Kishan: पत्र लिहून ईशान किशनला खडसावत जय शाहने दिली शेवटची वॉर्निंग; म्हणाले..

Haldi Ceremony : म्हणून लग्नापूर्वी वधू-वराला लावतात हळद; लग्न करण्यापूर्वी हळदीचे हे रहस्य माहिती असायलाच हवं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.