IPL 2024 : कोच माईक हेसनचा RCB ला घरचा आहेर; थेट वर्मावर बोट ठेवत म्हणाले..

0

IPL 2024 : आयपीएल (IPL 2024) केवळ भारतात नाही, तर जगभरातही सगळ्यात लोकप्रिय t20 लिग आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा आणि खेळाडूंचे स्वप्न असतं. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूमधील भारतीय संघात खेळण्याची संधी देखील मिळते. साहजिकच त्यामुळे खेळाडू आयपीएल प्राधान्य देताना दिसून येतात. आयपीएलने भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडूही दिले. ज्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांचा देखील समावेश आहे.

2008 पासून आयपीएलला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण 16 सिझन झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघांनी सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी एकूण पाच-पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकली नाही. मात्र तरीदेखील हा संघ नेहमी चर्चेत असतो.

आरसीबी (RCB) संघाचे कोच माईक हेसनने (Mike Hesson) रॉयल चॅलेंज बेंगलोर (royal challengers Bangalore) संघाला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. माईक हेसन म्हणाले, लेगस्पिनर युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) सोडणे ही आमची खूप मोठी चूक होती. नव्या नियमानुसार आम्ही केवळ तीनच खेळाडू ठेवू शकत होतो. यामध्ये आम्ही विराट कोहली (Virat Kohli) ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराजला (Mohammed Shami) ठेवण्याचा निर्णय घेतला. युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांना ऑप्शनमध्ये खरेदी करण्याचा आमचा मानस होता.

आम्ही आमचे पाच खेळाडू निश्चित केले होते. ज्यामध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, (harshal Patel) युझवेंद्र चहल यांचा समावेश होता. मात्र आम्हाला चहलला खरेदी करण्यामध्ये यश आले नाही. युझवेंद्र चहल ऑक्शन टेबलवर 65 वा खेळाडू म्हणून आला. त्यामुळे आम्ही त्याला खरेदी करू शकलो नाही, असं कोच माईक हेसनने म्हंटले आहे.

चहलला खरेदी करण्यासाठी आम्ही इतर खेळाडूंना सोडलं असतं, तर कदाचित चहल देखील आम्हाला मिळाला नसता. साहजिकच आम्हाला लेग स्पिनर शिवाय मैदानात उतरावं लागलं असतं. चहलला खरेदी करण्यासाठी इतर खेळाडूंना सोडणे मूर्खपणा ठरला असता. कदाचित चहलही मिळला नसता, आणि इतरही लेग स्पिनर मिळाले नसते. त्यामुळे नाईलाजास्तव चहल शिवाय आम्हाला संघ बांधायला लागला. अशीही कबुली कोच माईक हेसनने यांनी दिली.

हे देखील वाचाSania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकणार विवाहबंधनात? त्या ट्विटमुळे झाला खुलासा..

Rohit Sharma on youngsters : यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ध्रुव जुरेलचा फोटो पोस्ट करत रोहितने दिला थेट इशारा; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.