Chanakya Niti On Respect: या पाच कारणामुळे माणसाला कधीच मिळत नाही सन्मान..

0

Chanakya Niti On Respect: आयुष्यामध्ये यश (success) आणि सन्मान (Respect) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र दोन्हीही नसतील, तर, मनुष्य जिवंतपणी नरक यातना भोगतो. होय अनेकदा जीवनात यश मिळते, अनेकजण मुबलक प्रमाणात संपत्ती देखील कमवतात. मात्र प्रचंड संपत्ती मिळवून देखील अनेकांना सन्मान मिळत नाही. मनुष्य समाजशील प्राणी आहे. त्यामुळे साहजिकच समाजाकडून त्याला सन्मानाची अपेक्षा असते. तरच तो आनंदी जीवन जगू शकतो.

माणसाच्या जीवनातील यश आणि सन्मान या गोष्टींवर देखील आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) सविस्तर भाष्य केलं आहे. चाणक्य थोर विद्वान होते. आजही त्यांच्या नीतीनुसार (Chanakya niti) आयुष्य जगणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. माणसाने योग्य वयामध्ये आचार्य चाणक्य यांची नीती आत्मसात केली, तर जीवनात कोणत्याही परिस्थितीचा सामना करून माणूस यश सहजरित्या मिळवू शकतो.

स्वाभिमान आणि सन्मान माणसाची सर्वात मोठी संपत्ती असते. मात्र माणूस नेमका याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि कधी रसातळाला जातो, हे त्याचे त्यालाही कळत नाही. चाणक्य यांनी नेमका याच गोष्टींवर ठळक जोर दिला आहे. सन्मान आणि स्वाभिमान या दोन गोष्टी माणूस कसा वागतो, यावर अवलंबून असतात. चाणक्य सांगतात, समाजात तुम्हाला सन्मान हवा असेल, तर पाच गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊया सविस्तर.

चाणक्य सांगतात, मनुष्याने आयुष्यात कधीही खोटं बोलू नये. खरं बोलणं हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना असल्याचे चाणक्य सांगतात. खोटेपणा माणसाला कधी उध्वस्त करेल, हे कळतही नाही. आयुष्यामध्ये तुम्ही एखाद वेळेस खोटं बोलला, तर त्या खोट्याला पांघरून घालण्यासाठी तुम्हाला अनेकदा खोटं बोलावं लागतं. तुमचा हा व्यवहार लोकांना समजल्यानंतर, लोक किंचितही सन्मान करत नसल्याचं चाणक्य सांगतात.

समाजात वावरत असताना तुम्हाला चांगली वाईट लोकं भेटत राहतात. मात्र इतरांना कोणाविषयी देखील वाईट बोलू नका. तुमच्या या कृत्यामुळे अनेकांना असं वाटतं, माझ्याविषयी देखील हा माणूस इतरांजवळ वाईट बोलत असेल. साहजिकच तुमच्या बोलण्याला फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही. चाणक्य सांगतात, लोभ माणसाला अनेक वाईट मार्गावर घेऊन जातो. माणसाकडे लोक असेल तर तो आपले कर्तव्य आणि नीतिमत्तेपासून विचलित होतो. फायद्यासाठी कोणाचीही फसवणूक करण्यासाठी माणूस केवळ लोभामुळे तयार होतो.

अस्वच्छता आणि आळशीपणा मनुष्याला लागलेला सगळ्यात मोठा रोग आहे. अस्वच्छता आणि आळस यामुळे माणूस नेहमी नकारात्मकतेकडे जातो. अस्वच्छता आणि आळशीपणा असेल, तर तुमच्यामध्ये कधीही ऊर्जा संचारत नाही. ज्यामुळे लक्ष्मीची देखील कृपा तुमच्यावर होत नाही. आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आळस तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट करण्याची अनुमती देत नाही. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात, या गोष्टी तुम्ही अंगीकारल्या तर समाजात तुम्हाला कसलाही सन्मान मिळत नाही.

हे देखील वाचा Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Shoaib Malik: अबब! सानियाला सोडण्यासाठी शोएब मलिकला द्यावी लागणार इतकी रक्कम..

Google Pay loan: गूगलकडून 15 हजार ते एक लाखांपर्यंत घ्या उसने पैसे; वाचा सविस्तर प्रोसेस..

Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

Rohit Sharma Trade window: असा होणार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघात ट्रेड; नाईलाजाने अखेर मुंबई इंडियन्सचाही हिरवा कंदील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.