Shoaib Malik: अबब! सानियाला सोडण्यासाठी शोएब मलिकला द्यावी लागणार इतकी रक्कम..

0

Shoaib Malik: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) या दोघांची एकत्रित इनिंग आता संपुष्टात आली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) काल पाकिस्तान अभिनेत्रीशी लग्न केले. सानीया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचा घटस्पोट झाल्याच्या बातम्या गेल्या दीड वर्षापासून सातत्याने समोर येत होत्या. या बातम्यांवर आता अखेर पडदा पडला असून, अधिकृतरित्या हे दोघेही वेगळे झाले आहेत.

शोएब मलिकने पाकिस्तान अभिनेत्री सना जावेद (sana Javed) बरोबर तिसरं लग्न साजरे केले. सानिया मिर्झा सोबत विवाह करण्यापूर्वी शोएब मलिकने आयशा सिद्दीकी सोबतही लग्न केले होते. मात्र दोघांच्या लग्नाच्या चर्चा फारशा झाल्या नव्हत्या. 2010 मध्ये सानिया आणि शोएब दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आयशा सिद्दीकी लाइम लाइटमध्ये आली होती.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचं लग्न जमल्यानंतर आयुष्याने शोएब सोबत 2002 मध्ये मी लग्न केलं होतं. आमचा अध्यापही घटस्फोट झाला नाही. तरीदेखील तो दुसरं लग्न करत असल्याची तक्रार आयशाने पोलिसांमध्ये दाखल केली होती. दोघांच्या लग्नाचा पुरावा म्हणून तिने व्हिडिओ देखील प्रसारित केला होता. नंतर तिने घटस्फोटाबरोबर शोएब मलिक कडून पंधरा कोटी रुपये पोटगी देखील घेतल्याचं समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा एका वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. सना जावेदने देखील आपलं पाहिले लग्न 2020 मध्ये लग्न केले होते. शोएब मलिक बरोबर हे तिचं दुसरं लग्न आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्पोटाला सना जावेद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. शोएब आणि सनाची वाढती जवळीकता सानिया आणि शोएबचा संसार मोडण्यासाठी कारणीभूत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

शोएब मलिक सोबत घटस्फोट झाल्यानंतर, आता सानियाला किती पोटगी मिळेल या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. आयशा सोबत पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्यानंतर तिला पंधरा कोटी रुपये पोटगी देण्यात आली होती. यावेळी मात्र शोएब आणि सानिया या दोघांनाही एक मूल आहे. त्यामुळे तीस कोटीपेक्षा अधिक पोटगी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. शोएब मलिकची एकूण संपत्ती 230 कोटी पेक्षा अधिक आहे.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Shoaib Malik married: सानियाला अंधारात ठेऊन शोएब मलिकने या महिलेशी लग्न केल्याने खळबळ; सानियाला मानसिक धक्का..

Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Google Pay loan: गूगलकडून 15 हजार ते एक लाखांपर्यंत घ्या उसने पैसे; वाचा सविस्तर प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.