Shoaib Malik married: सानियाला अंधारात ठेऊन शोएब मलिकने या महिलेशी लग्न केल्याने खळबळ; सानियाला मानसिक धक्का..

0

Shoaib Malik married: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) या दोघांचा घटस्फोट (Sania Mirza Shoaib Malik divorce) झाल्याच्या बातम्या गेल्या वर्षापासून सुरू होत्या. परंतु आपल्या घटस्फोटावर दोघांनीही अधिकृतरित्या भाष्य केलं नव्हतं. आता मात्र सानिया मिर्झाचा पूर्वपती शोएब मलिकने लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. (Shoaib Malik married Pak actress Sana Javed) सानिया मिर्झा आणि शोएब मलिक वेगळे झाल्याच्या बातम्या अनेक माध्यमातून सातत्याने येत होत्या. मात्र अधिकृतरित्या या दोघांकडूनही घटस्फोट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले नव्हते.

आता मात्र दोघेही अधिकृतरीत्या वेगळे झाले असू, शोएब मलिकने निकाह (nikaah) देखील केला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, आपली पूर्वपत्नी सानिया मिर्झाला शोएब मलिकने निकाह करत असल्याचे कळवले देखील नसल्याची माहिती आहे. शोएब मलिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करून नीकाह केल्याची माहिती दिली आहे. शोएब मलिकच्या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली असून, सानिया मिर्झाला मानसिक धक्का बसल्याचे सांगितलं जात आहे.

शोएब मलिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून निकाह केल्याची माहिती दिली. पाकिस्तान अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) शोएब मलिकने निकाह केल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये दोघेही प्रचंड रोमँटिक अंदाजामध्ये पोझ देताना पाहायला मिळत आहेत. सना जावेद या अभिनेत्रीचे देखील यापूर्वी लग्न झालं होतं. शोएब मलिक सोबत हे तीचे दुसरे लग्न असून, लग्नापासून तिला कोणतेही मुल नाही.

शोएब मलिकने 2010 ला सानिया सोबत आपल्या आयुष्याची सुरुवात केली. सानिया मिर्झासोबत विवाह करण्यापूर्वी शोएब मलिकचे पाहिले लग्नही झाले होते. आता तो पाकिस्तान अभिनेत्री सना जावेदसोबत तिसऱ्यांदा बोहल्यावरवर चढला आहे. दोन दिवसापूर्वी सानिया मिर्झाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोट आणि लग्न संदर्भात एक पोस्ट केली होती.

दोन दिवसापूर्वी सानिया मिर्झाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून पोस्ट करत म्हंटले होते, लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी प्रचंड वेदनादायी आहेत. मात्र हे बोलताना तिने आपण शोएब मलिक पासून वेगळं झालो असल्याचे कुठेही म्हंटले नव्हते. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाने 2018 मध्ये गोंडस मुलाला जन्म देखील दिला. सध्या त्याचा सांभाळ सानिया करते आहे.

सानिया मिर्झाने केलेला पोस्टमुळे ती यापुढे लग्न करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शोएब मलिकच्या या निर्णयामुळे तिला मानसिक धक्का बसला असल्याचे देखील बोलले जात आहे. दोघेही एकत्र असताना शोएबची सनासोबत वाढलेली जवळीकता दोघेही वेगळे व्हायला कारणीभूत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बातम्यांना आता दुजोरा मिळाला असून, अखेर सानिया मलिक आणि शोएब मलिक यांची एकत्रित इनिंग संपुष्टात आली आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Google Pay loan: गूगलकडून 15 हजार ते एक लाखांपर्यंत घ्या उसने पैसे; वाचा सविस्तर प्रोसेस..

Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.