Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

0

Rohit Sharma talking T20 World Cup: 2022 आणि 2023 ही दोन्ही वर्ष भारतीय क्रिकेटसाठी प्रचंड निराशावादी ठरली. टी-ट्वेंटी विश्वचषक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिसीय विश्वचषक अशा तीन आयसीसी स्पर्धा भारतीय संघाने लगातार गमावल्या. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने लगातार 10 सामने जिंकले. मात्र दहा सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव पत्करावा लागला. फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मासह (Rohit Sharma) संघातील सर्व खेळाडू प्रचंड भावुक झाल्याचे दृश्य टीव्हीवर पाहायला मिळालं.

मात्र आता 2024 या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. याच वर्षी भारतीय संघाला वेस्टइंडीजमध्ये टी ट्वेंटी विश्वचषकही (T20 World Cup2024) खेळायचा आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाची तयारी देखील जोरदार आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी मालिका जिंकत भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाला व्हाइट वॉश दिला. तिसरा t20 सामना जिकल्यानंतर रोहित शर्माने जिओ सिनेमाशी संवाद साधला. या संवादामध्ये आगामी विश्वचषकाविषयी रोहित शर्माने सविस्तरपणे भाष्यही केलं.

2022 नंतर खेळलेल्या अनेक t20 मालिकांमध्ये अनेक नवीन खेळाडूंना खेळण्याचे संधी मिळाली. अनेक खेळाडूंनी दमदार परफॉर्मन्स देखील केला. मात्र पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीची (Virat kohli) टी ट्वेंटी संघात वापसी झाल्याने, आता अनेकांना टी-ट्वेंटी विश्वचषक संघाचा भाग होता येणार नाही. यावर देखील रोहित शर्माने भाष्य केलं.

जिओ सिनेमाशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, T20 विश्वचषकासाठी आमचा संघ सज्ज झाला आहे. 2022 नंतर मी टी ट्वेंटी सामने खेळलो नाही. मात्र राहुल द्रविड यांच्याशी मी बातचीत केली आहे. टी-ट्वेंटी विश्वचषक संघासाठी आमच्याकडे जवळपास नऊ ते दहा खेळाडू निश्चित देखील आहेत. काही खेळाडूंच्या जागा शिल्लक आहेत. त्याची निवड खेळपट्टी, फॉर्मच्या आधारे केली जाणार असल्याचे भाष्य रोहित शर्माने केले.

9 ते 10 खेळाडू निश्चित झाले आहेत. असं रोहित शर्मा म्हणाला असला, तरी ते दहा खेळाडू नक्की कोणते? हे जाणून घेण्याची आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. t20 विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या स्वप्नातले कोणते आहेत ते दहा खेळाडू, जाणून घेऊया सविस्तर..

यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा सलामीला येण्याची शक्यता अधिक आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या/शिवम दुबे असतील. सहाव्या क्रमांकावर संजू सॅमसन/ केएल राहुल/ जितेश शर्मा या तिघांपैकी दोघांना 15 च्या संघात संधी मिळेल. रिंकू सिंह, रवींद्र जडेजा/ अक्षर पटेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्षदीप सिंग, कुलदीप यादव, हे खेळाडू भारतीय 15 च्या संघात जवळपास निश्चित मानले जात आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माची t20 संघात वापसी झाल्यामुळे भारतीय संघ कसा असेल, याविषयी स्पष्टता आली आहे. मात्र भारतीय संघाची अंतिम 11 काय असेल, याविषयी मात्र अजूनही कमालीची संभ्रमता आहे. त्याचे कारण म्हणजे, रिंकू सिंहला भारताच्या प्लेइंग11 मध्ये जागा करून देणं, हे टीम मॅनेजमेंट पुढेचे मोठे आव्हान असणार आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma on T20 World Cup: T20 मध्ये मीच कर्णधार असणार; रोहितने या शब्दात साधला पांड्यावर निशाणा..

Rohit Sharma Trade window: असा होणार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघात ट्रेड; नाईलाजाने अखेर मुंबई इंडियन्सचाही हिरवा कंदील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.