Rohit Sharma Trade window: असा होणार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघात ट्रेड; नाईलाजाने अखेर मुंबई इंडियन्सचाही हिरवा कंदील..

0

Rohit Sharma Trade window: आयपीएल लिलाव (IPL auction 2024) प्रक्रिया पार पडली असली तरी अजूनही खेळाडूंना कोणत्याही संघात जाता येणार आहे. आयपीएल लिलाव प्रक्रियेत रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चर्चेचा विषय बनले होते. आता पुन्हा एकदा ट्रेडच्या चर्चा सुरू असून, रोहित शर्मा मुंबईकडून खेळण्यासाठी इच्छुक नसल्याचं समोर आले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्पष्ट नकार दिल्याने, मुंबई इंडियन्सला देखील नाईलाजाने रोहित शर्माला सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

आयपीएल लिलाव प्रक्रियेपूर्वी मुंबई इंडियन्स कडून आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला. ट्रेड विंडोच्या (ipl trade window) माध्यमातून गुजरात टायटन्स संघाकडून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सने खरेदी केले. कर्णधारपद सोडून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात का सामील होतोय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. जर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील होत असेल, तर रोहित शर्मा कर्णधार असणार की नाही? यावर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.

लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स कडून अनेकांना धक्का देत, रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई इंडियन्स हा निर्णय रोहित शर्मा आणि त्याच्या परिवाराला देखील आवडला नसल्याचे पाहायला मिळाले. रोहितची पत्नी रीतीकाने कमेंटद्वारे उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवली. आता रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार नसल्याचं समोर आले आहे. मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने या संदर्भात आपली सविस्तर भूमिका देखील कळवली आहे.

प्रचंड विनवणी करून देखील रोहित शर्मा आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे मुंबई इंडियन्सने देखील रोहित शर्माला ट्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल सुरू होण्याच्या एक महिना अगोदरपर्यंत ट्रेड विंडो ओपन असणार आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूंना कोणत्याही संघासोबत करारबद्ध होता येणार आहे. मात्र त्यासाठी मूळ संघाची सहमत हवी आहे. रोहित शर्मा lला ट्रेड करण्यासाठी मुंबई सहमत असल्यामुळे, रोहित शर्माला कोणत्याही संघात जाता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ गांगुली आणि रोहित शर्माचं बोलणं झालं आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद देण्यासाठी देखील दिल्ली कॅपिटल्स मॅनेजमेंट तयार आहे. फिटनेसमुळे ऋषभ पंत केवळ इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनच 2024 आयपीएल सीझन खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल संघाकडे सर्वाधिक पर्स आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सर्वाधिक नऊ कोटी 90 लाख रुपये शिल्लक आहेत. पृथ्वी शॉ मुंबई इंडियन्सला देण्यात येणार असून, त्या बदल्यात रोहित शर्मा आणि काही रक्कम दिल्ली कॅपिटल मोजणार असल्याची माहिती आहे.

हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा दोघांमध्येही इगो क्लॅश झाल्याची माहिती आहे. हार्दिक पांड्या देखील सलामीवीर म्हणून रोहित शर्मा ऐवजी पृथ्वी शॉला खेळवणं पसंत करत असल्याची माहिती आहे. गेले तीन सीजन फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही रोहित शर्मा प्रचंड साधारण राहिला आहे. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा फॉर्म गेल्या अनेक वर्षांपासूनची मोठी समस्या आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला देखील हा निर्णय घेणे अधिक सोप्प झाल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ या दोघांच्या ट्रेड विंडोची तारीख अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र लवकरच हा करार केला जाणार आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma Rinku Singh: रोहित शर्माच्या त्या प्लॅनमध्ये रिंकू सिंहचा जातोय बळी..

IND vs AFG Rohit Sharma: विराट कोहलीचा इंटेंट आणि रोहित शर्माच्या प्लॅनमुळे हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम..

Rohit Sharma MI ..अन्यथा बेंचवर बसेन! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास रोहितचा नकार; पर्याय संपल्याने मुंबईने उचलले मोठे पाऊल..

Rohit Sharma vs mumbai Indians: रोहित शर्मा पुढे मुंबई इंडियन्सची शरणागती; मुंबई इंडियन्स कडून अखेर यूटर्न..

IND vs AFG 3rd T20I: उद्याचा सामना या तीन खेळाडूंचे भवितव्य ठरवणार; दोघांकडे शेवटची संधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.